हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग
सपोनि नवनाथ गायकवाड,पो.काँ. गणेश इंगोले,पो.ना.संदीप पाटील, पो. ना.हरिप्रसाद औटी यांची कामगिरी
उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशानुसार भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अंतर्गत हद्द्पार आरोपी दत्ता काळे यास सहा महिने कालावधी करिता हद्द्पार करण्यात आले होते. सदर आदेशाची प्रत दत्ता शहात्तर काळे यास बजावणी करण्यात आली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी सपोनि गायकवाड यांना फोन वरून कळविले की, हद्दपार करण्यात आलेला इसम नामे दत्ता शहात्तर काळे रा.शिंदे चौक, इसबावी,पंढरपूर हा इसबावी येथील दूध पंढरी समोर उभा असुन त्या ठिकाणी जावुन त्यास पकडून पोलीस ठाणेस आणून पुढील योग्यती कारवाई करावी.या आदेशानुसार सपोनि गायकवाड,पो.काँ. इंगोले,पो.ना.पाटील, पो. ना. औटी हे खाजगी वाहनाने इसबावी येथील दूधपंढरी समोर गेले असता हददपार इसम नामे दत्ता शहात्तर काळे हा रोडचे कडेला झाडाखाली उभा असलेला त्यांना दिसला. पोलीस असल्याची चाहूल लागताच आरोपी दत्ता शहात्तर काळे हा पळून जात असताना त्यास गुन्हे शाखेच्या वरील तीनही थरारक पाठलाग करून पकडले.या थरार नाट्याची चर्चा बुधवारी संपूर्ण इसबावी परिसरात चर्चिली गेली आहे
.
हद्दपारीतील आरोपी दत्ता शहात्तर काळे यास थरारक पाठलाग करून जेरबंद केल्यामुळे वरील तीनही पोलीस कार्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात असून सदर आरोपी विरोधात भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अंतर्गत हद्द्पार / एस/आर/38/2019 दिनांक 03/02/2020 या आदेषाचा भंग केला म्हणून त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 प्रमाणे र फिर्याद दाखल करण्यात आली आहे