गुन्हे विश्व

८५ लाख रुपये दिले नाहीत म्हणून रामभाऊ गायकवाडने टॉवर पाडले

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे व आढीव येथील एनटीपीसीचे वीज वाहक टॉवर प्रति टॉवर दोन लाख प्रमाणे ८५ लाख रुपयांची मागणी करूनही दिले नाहीत म्हणून रामभाऊ गायकवाड आणि त्याच्या गॅस कटरच्या वापर करीत पाडून टाकले आहेत अशा आशयाची फिर्याद एनटीपीसीचे अधिकारी के वमसी मोहन यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.   

 या बाबत सविस्तर वृत्त असे कि, काही दिवसापूर्वी राष्ट्रीय औष्णिक विद्युत मंडळाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे व आढीव परिसरातील वीज पारेषण टॉवर गॅस कटरच्या साहाय्याने पाडून टाकण्यात आल्याची घटना घडली होती.या घटने नंतर या मागील वेगळाच प्रकार दाखल तक्रारीतून पुढे आला असून राजकीय वलय असलेला व नेता म्हणून वावरणारा रामभाऊ गायकवाड याने २७ फेब्रुवारी २०२१ रोजी ९१३१३६३१९२ या मोबाईल क्रमांकावरून वरिष्ठ प्रबंधक जयवर्धन शेखावत याना फोन करून काही तरी पैसे द्या आम्ही कामास आडवे येणार नाही असे बोलणे केले होते.मात्र यास कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही,८५ लाख रुपये दिले नाहीत म्हणून रामभाऊ गायकवाड याने गॅस कटरच्या साहाय्याने टॉवर पाडले अशी फिर्याद एनटीपीसीचे अधिकारी के वमसी मोहन यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *