

ऊन,पाऊस यापासून ग्रामीण भागातील प्रवाशांना होणार त्रास लक्षात घेत पंढरपूर तालुक्यातील २८ गावात ३१ एसटी पिकअप शेड उभारले जाणार असून यासाठी सुमारे २६ लाख रुपये खर्च अपेक्षित असून याची निविदा प्रक्रिया सध्या सुरु आहे.सदर कामासाठी इच्छुक असणाऱ्यांना ३० ऑक्टोबर पर्यंत निविदा भरता येणार आहेत.
ग्रामीण भागातून शहरी भागात येजा करण्यासाठी एसटी तसेच इतरही खाजगी वडाप वाहतुकीचा मार्ग अवलंबला जातो.मात्र अनेकदा विद्यार्थी,अबालवृद्ध प्रवाशी यांना वाहनांची वाट पहात बराच वेळ ताटकळत थांबावे लागते.अशा वेळी ऊन,पाऊस याचा त्रासही प्रवाशांना सहन करावा लागतो.हि अडचण लक्षात घेत व सद्याच्या अनेक निवारा शेडची दुरावस्था झाल्याने आता नव्याने ३१ शेड बांधले जाणार आहेत.