आई आणि बहिणीसोबत श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आलेली हदगाव जिल्हा नांदेड येथील भाविक हे दिनांक २० ऑक्टोबर रोजी पहाटे चंद्रभागा स्नानासाठी गेले असता वाळवंटात नदी तीरावर ठेवलेल्या कपड्यातून ३ हजार रुपये रोख व रेड मी नोट प्रो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.
य बाबत दिगंबर उत्तमराव अडलंग वय-26 वर्षे, धंदा- शिक्षण,रा- आसमंत,शारदानगर,ता.जि.नांदेड सध्या रा.सदाशिव पेठ,पुणे यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून भक्त पुंडलिक मंदिर पंढरपुर परिसरातून वरिल वर्णनाचे व किंमतीचे साहित्य अज्ञात आरोपीने चोरुन नेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.