Uncategorized

एवढं टोकाला जाणे योग्य नव्हते !

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरु झालेले असतानाच राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार यांना या पदावरून हटवित गेल्याच महिन्यात विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेल्या विजयसिह देशमुख यांचे तालुकाध्यक्ष पद देऊन पुनर्वसन करण्यात आले होते.काल देशमुख याना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आणि आज विठ्ठल हॉस्पिटपल येथे राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.मात्र या बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निडणुकीत स्वतंत्र पॅनल उतरविणार असल्याची घोषणा करतानाच विधानसभा निवडणुकीची उमेदवारी कशी मिळते ते पाहतोच असेही विधान केल्यामुळे विठ्ठल परिवारात व आ.भालके सर्मथकांत खळबळ उडाली आहे.हि बैठक दीपक पवार याना पदावरून हटविल्याने आयोजित करण्यात आली होती कि गेल्या अनेक महिन्यापासून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये निर्माण झालेल्या भालके समर्थक व विरोधक या दोन अंतर्गत प्रवाहाचे शक्ती प्रदर्शन होते असाच प्रश्न आता भालके समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.   

 या बाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याशी संपर्क केला असता नाराजी होती,बैठक घेताय हे ठीक आहे पण आपली नाराजी मला किंवा आणखी वरिष्ठाना लेखी अथवा भेट घेऊन सांगता येत होती.तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले विजय देशमुख याना विश्वासात न घेता हटविण्यात आले होते अशी भावना पक्षाच्या निरीक्षकासमोर मांडण्यात आली.तुम्ही नाराज होता तुम्हीही मांडू शकला असता पण अशा पद्धतीने टोकाची भूमिका घेणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया बळीराम साठे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त केली आहे.         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *