पंढरपूर : नुकतेच नगरपालिकेचे जनरल सभा पार पडली जनरल सभेत अनेक विषयावर चर्चा होऊन मा.नगरसेवक आनिल अभंगराव व सुधीर धोत्रे यांनी नगरपालिकेने महसुल उत्पन वाढी साठी उपाययोना केली नाही व 5 कोटी झोपडपट्टी कर वसुल केला नाही म्हणून नगरपालीकेच्या मुख्याधीकारास जबाबदार धरले. त्यानी नगरपालिकेच्या हिताचे व नगरपालिकेच्या उत्पन्न वाढी साठी बाजु मांडली त्या बद्दल त्याचे अभिनंदन परंतु मा.मुख्याधीकरी यांनी सदर चा कर वसुलीचे नियोजन केलेले नसल्याचे दिसुन येत आहे तसेच जनरल बॉडी मध्ये झालेल्या चर्चे मधुनच मुख्याधिकारी यांच्या वसुलीचे अकार्यक्षम नियोजन दिसत आहे म्हणून त्याच्या वर वसुलीच्या कामात कुचराई केली म्हणून कारवाई करावी. पुर्वी वसुली विभातील क्लार्क व शिपाई झोपडपट्टी धारकाच्या दारात व मालमत्ता धारकांच्या दारात पहिली सहामाही व दुसरी सहामाही असे 1965 च्या कलमा अनुवये मागणी बिल देत असत व ते दारात जाऊन वसुल करित असतल परंतु आता सध्या कर्मचार्याची संख्या कमी असल्या कारणारे ऑफीस मध्ये बसुनच वसुल करत आहेत. सध्या ते कर्मचारी मार्च एन्ड असल्या कारणाने जप्ती साठी जात आहेत.पहिली सहामाही व दुसर्या सहामाही बिल देण्याचे पद्धत बंद करून एकच मागणी बिल दिले जाते. सदर चे कृत्य हे मागील मुख्याधीकार्याच्या सांगण्यावरून बदल केला आहे. याला नगर विकास विभागाची मान्यता आली का ? यामुळेच वसुली चे नगरपालिकेचे नियोजन चुकले आहे. जर वसुली कर्मचारी झोपडपट्टी धारकांच्या दारात पुर्वी प्रमाणे गेले असते तर एवढी थकबाकी झाली नसती. तसेच पुर्वी चे वसुली कर्मचारी झोपडीला नाव लावून देण्यात प्रथम असत परंतु वसुली साठी मात्र शेवट असत अशा या कारभारामुळे गेल्या अनेक वर्षोपासुन ची ही थकबाकी आहे. तरी आमच्या ब्रम्हण सेल तर्फे आम्ही नगरपालिकेला एक पर्याय सुचवू इच्छितो पाणि विभागाकडील वॉल्ह सोडणारे कर्मचारी आधिक हद्दीवरील शिपाई (आरोग्य खात्याकडील) व प्रत्येक विभागातील सफाई कर्मचार्याना घेऊन प्रत्येक झोपडपट्टी वर 3 कर्मचार्याची टिम तयार करून त्याच्या कडे विभागवार येणे बाकी ची यादी द्यावी, व प्रत्येक झोपडपट्टी धारकांच्या घरी जाऊन वसुली करावी असे नियोजन मागील मुख्याधीकारी जिवन सोनवणे यांनी त्यामुळे झोपडपट्टी धारकांची कर वसुली अत्यंत योग्य पद्धतीने झाली. या मध्ये नगरपालिकेच्या नियोजनाचा आभाव दिसून येतो. झोपडपट्टी धारकांना या मध्ये दोषी धरू नये कारण हा सर्व गोंधळ नगरपालिकेच्या नियोजना अभावी झाला आहे. पुर्वीच्या पद्धतीने सहामाही बिले दिली असती व कर्मचारी झोपडपट्टी पर्यत पोहचले असते तर कदाचीत अधिप्रमाणे 100 % कर वसुल झाला असता. परंतु आत्ता च्या पद्धतीने वार्षिक बिल दिल्या मुळे झोपडपट्टी धारकांना एकरक्कमी कर भरणे त्रासदायक होतो. तसेच कर्मचारी घरोघरी न पोहचल्याने ही वसुली अधिक प्रमाणार रखडली गेली या मध्ये मुख्याधीकारी यांच्या नियोजनाचा आभाव दिसून येतो तरी त्यानी केलेल्या कामातच्या कुचरायी साठी त्याच्या वर त्वरीत कारवाई करावी ही विनंती. तरी पंढरपूरावर मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब व मा.श्री.अजित दादा पवार यांचे लक्ष आहे तरी याबाबत त्यांनी पुढील कारवाई करावी.
