महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर आणि कृषिअधिकाऱ्यावर कारवाई करा
बळीराजा शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ द्या, किसान क्रेडिट कार्ड,पशुधन खरेदी कर्ज याबाबत चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना देण्यात अपमानास्पद वागणूक देण्याऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक व कृषी अधिकारी झिरपे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहिती देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष माउली हळणवर म्हणाले कि ,राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे चालू पीककर्ज थकीत आहे त्यांना नव्याने पीककर्ज देण्यात यावे असे आदेश दिले आहेत असे असताना काही बँकाकडून वनटाईम सेटलमेंट केलेल्या कर्जदारांचे सिबिल खराब असल्याचे सांगत आहेत. तर विभक्त कुटुंब असताना व स्वतंत्र सातबारा असतानाही रक्ताचे नाते असल्याचे कारण दाखवत पीक कर्जे व विविध योजनांतर्गत कर्जे नाकारली जात आहेत.तरी या बँकाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
जनहित शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे,बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्य्क्ष माउली जवळेकर,जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले, सचिन आटकले,सचिन शिंदे,दत्ता माने,बंडू माने आदी उपस्थित होते.