बीड – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर देखील आरोप झाले आहेत. त्यांच्यासोबत पूजाचे संबंध होते, असे देखील म्हटले जात आहे. आता पूजा चव्हाणच्या वडिलांची एक भावनिक प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर आली असून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशाराच दिला आहे. पूजाची सध्या चाललेली बदनामी थांबली नाही, तर मला कुटुंबासोबत आत्महत्याच करावी लागेल, अशा शब्दांत पूजाच्या वडिलांनी आपल्या तीव्र भावना एबीपीशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. त्यासोबतच, पूजाच्या संपूर्ण कुटुंबाने ही बदनामी त्वरीत थांबवावी अशी मागणी केली आहे.
