

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथून जेसीबीच्या साहाय्याने भरदिवसा अवैध वाळू उपसा करून नदीकाठच्या शेतजमिनीत साठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत MH 13 AJ 5704 या जेसीबीसह शेतामध्ये साठा केलेला वाळू साठा असा २२ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.तर या प्रकरणी जेसीबी चालक राजू दत्तात्रय वालेकर वय. 22 वर्ष रा. दसूर ता. इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक , सध्या आंबे ता. पंढरपूर व शेतमालक व जेसिबी मालक हरि शिवाजी शिंदे रा. आंबे ता.पंढरपूर यांच्या विरुद्ध भा.द.वि. 379,34 सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पो.ना.विक्रम चांगदेव काळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे आंबे ता.पंढरपूर शिवारातील भिमा नदीचे पात्रालगत शेत जमीन आसणारे हरि शिवाजी शिंदे यांचे शेताजवळील भिमा नदीपात्रातून जेसीबी च्या साहाय्याने वाळुचा अवैध उपसा करून ती वाळू शेतामध्ये साठवण करत आहेत. मंगळवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी 09/30वा.चे सुमारास फिर्यादीसह पो.हे.काँ.चवरे,पो.ना.ताटे ,पो.काँ.बाबर हे घटनास्थळी गेले असता तेथे फिर्यादीत नमूद वरील दोन आरोपी हे जेसीबी च्या साहाय्याने भिमा नदी पात्रातुन अवैध वाळुचा उपसा करून ती लगत असलेल्या शेतामध्ये साठवण करत असल्याचे दिसले असता तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.