ताज्याघडामोडी

कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’द्वारे स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’द्वारे स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

 पंढरपूर:-उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, निर्भया पथक पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’ चे आयोजन करण्यात आले होते. येथील छत्रपती शिवाजी चौक, विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी जवळ आणि भादुले चौक या ठिकाणी ‘कोरोना’ या वाढत्या महामारी पासून नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घेण्यासाठी व शहरातील नागरिकांमध्ये समाज प्रबोधन करून जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

          स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. यशपाल खेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीचे विद्यार्थी वैष्णवी रोटे, प्रशांत माळी, मदन पाटील, अभिजीत रोटे, ऐश्वर्या विरधे, सारिका मोरे, सोनाली गायकवाड व शितल ताटे यांनी या पथनाट्यात सहभाग घेतला होता. पथनाट्याचे उदघाटन पंढरपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. स्वेरीचे विद्यार्थी या पथनाट्यामधून नागरिकांनी मास्कचा व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा आणि आपसात ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळण्याचे जनतेला आवाहन करत होते. स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा  असलेल्या नागरिकांनी पथनाट्याद्वारे मिळालेल्या सूचनांचेसंदेशाचे पालन करण्याचेही आश्वासन दिले. पथनाट्यातून लग्न समारंभाला होणारी गर्दी, चौकाचौकात होणारी नाहक तरुणांची गर्दी, दर्शनासाठी होणारी भक्तांची व वारकऱ्यांची गर्दी आणि पोलिस दिसताक्षणी नागरिकांचे चेहऱ्यावर मास्क लावणे. अशा बारीक सारीक बाबींचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी पथनाट्य तयार केले होते. एकूणच पथनाट्यांद्वारे ‘गर्दी टाळा, काळजी घ्या आणि कोरोनापासून स्वतःचे व इतरांचे संरक्षण करा’ हाच संदेश स्वेरीचे विद्यार्थी देत होते. यातूनच स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे मनोरंजनातून उत्तमरित्या जनजागृती केली. यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार, निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, निर्भया पथकातील पोलीस कर्मचारी म.पो.कॉ.कुसुम क्षिरसागर, चंदा निमंगरे, नीता डोकडे, पो.कॉ.अरबाज खाटीक, गणेश इंगोले, महेश काळे, पो.हे.कॉ. अविनाश रोडगे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्यासह इतर अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *