वेणू सोपान वेल्फेअर फाउंडेशन, पुणे व अँड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन, पुणे यांनी
श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रत्येकी एक नग प्रमाणे एकूण दोन नग इलेक्ट्रीक रिक्षा श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरला सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून दिल्या. त्याचा लोकार्पण सोहळा आज रविवार दिनांक २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी स.१०.०० वाजता श्री.संत नामदेव पायरी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास मा. न्यायाधिश पंढरपूर श्री.अच्युत कराड, संस्थापक व्यसनमुक्त युबक संघ ह.भ.प.
बंडातात्या कराडकर, संत नामदेव महाराज वंशज ह.भ.प.केशव महाराज नामदास, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे वंश परंपरागत चोपदार ह.भ्.प.राजाभाउ चोपदार, संस्थापक वारकरी पाईक संघटना पंढरपूर ह.भ.प.राणा महाराज वासकर तसेच मंदिर समितीचे मा.सदस्य ह.भ.प.ज्ञानेश््वर महाराज
जळगांवकर, अँड.माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी श्री.बिठ्ठल जोशी, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड
तसेच सौ.वंदना बबनराव गायकवाड अध्यक्षा वेणू सोपान वेलफअर फाउंडेशन उपस्थित होते. तसेच मंदिर समितीचे कर्मचारी ब भाविक उपस्थित होते.
सदरच्या दोन्ही इलेक्ट्रीक रिक्षा चौफाळा ते मंदिर व महाद्वार ते मंदिर दरम्यान अंध, अपंग, वयस्कर, गरोदर महिला इत्यांदीसाठी वापरण्यात येणार आहेत. या दोन्ही रिक्षांची अंदाजित किंमत रू.९.००/- लक्ष आहे. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाईजर व मास्क चा वापर करण्यात येवून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.