ताज्याघडामोडी

आधार कार्ड खाजगी संस्थेत देऊ नये सांगणारं पत्रक सरकारनं गोंधळानंतर घेतलं मागे

आपलं आधार कार्ड किंवा त्याची फोटोकॉपी कोणत्याही विनापरवाना खाजगी संस्थेत शेअर करू नये म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने शुक्रवारी एक नियमावली प्रसिद्ध केली होती. मात्र प्राधिकारण्याच्या या नियमावलीवर वादंग निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने आज त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) दिनांक 27 मे, शुक्रवारी आधारकार्ड संबंधी नवी नियमावली प्रसिद्ध केली होती.

नागरिकांनी ओरिजिनल आधार कार्ड ऐवजी त्यांच्या मास्क आधार कार्डचा वापर करावा असा सल्ला प्राधिकरणाकडून देण्यात आला होता.

या नियमावलीत कोणत्या सूचना देण्यात आल्या होत्या?

1. आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून लोकांनी आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नये. त्याऐवजी तुम्ही मास्क आधार कार्ड वापरू शकता. तुमचा पूर्ण 12 अंकी आधार क्रमांक मास्क आधार कार्डमध्ये दिसत नाही. त्याऐवजी आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अंक दिसतात. हे मास्क आधार ऑनलाइन देखील मिळवता येतं.

2. प्राधिकरणाने म्हटलं आहे की, कोणत्याही आधार क्रमांकाची सत्यता पडताळण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar वर भेट देता येईल. तसेच ऑफलाइन पडताळणीसाठी तुम्ही mAadhaar मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये QR कोड स्कॅनर वापरून ई-आधार किंवा आधारकार्ड किंवा आधार पीव्हीसी कार्डवरील QR कोड स्कॅन करू शकता.

3. सरकारने लोकांना चेतावणी देतं म्हटलं आहे की, त्यांनी सार्वजनिक कॉम्प्युटर किंवा सायबर कॅफेमधून आधारची प्रत डाउनलोड करू नये. तसं केल्यास, डाउनलोड केलेल्या आधारच्या प्रती पर्मनंट डिलीट झाल्या आहेत याची खात्री करा.

4. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या नियमावलीत हे ही स्पष्ट केलं आहे की, विनापरवाना खाजगी संस्था तुमचे आधारकार्ड मागू किंवा ठेवू शकत नाहीत. यामध्ये विनापरवाना हॉटेल्स आणि सिनेमा हॉलचा ही समावेश करण्यात आला आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून आधारसाठी युजर लायसन्स घेतलं असेल अशाच खाजगी संस्था तुमच्या आधार कार्डची प्रत मागू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *