Uncategorized

खडीक्रशर चालकाकडून साडेपाच लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले

स्टोन क्रशरचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि नोटीस मागे घेण्यासाठी साडे पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्रांताधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहात पकडण्यात आलं आहे. राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसंजीत प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून रविवारी सुट्टी असतानाही लाच घेण्यासाठी कामाची तत्परता दाखवणाऱ्या या अधिकाऱ्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राधानगरी तालुक्यातील फराळे या गावाच्या हद्दीत तक्रारदार व्यक्तीचा स्टोन क्रेशरचा व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे प्रदूषण तसंच रस्ता खराब होत असल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस सरपंच डवर याने दिली होती. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनीदेखील अशाच प्रकारची नोटीस दिली. ही नोटीस मागे घेण्यासाठी सरपंच डवर याने ११ लाख रुपये लाच मागितली. यातील एक लाख स्वतःसाठी व दहा लाख रुपये प्रांताधिकारी प्रधान यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *