Uncategorized

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद कॉग्रेसच्या वाटयाला 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या तीनही पक्षात गेल्या काही दिवसापासून अस्वस्तथा निर्माण झाली असून विविध ५० महामंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्या आणि शिर्डी आणि पंढरपुर मंदिर समितीची प्रतीक्षेत असलेली पुनर्र्चना यामुळे तीनही पक्षातील अनेक इच्छुक याकडे डोळे लावून बसले होते.मात्र निर्णय होत नसल्याने नाराजी वाढत चालली होती.याचे पडसाद पक्षीय पातळीवर उमटू लागल्याने तिन्ही पक्षाच्या समन्वयकाच्या ठाणे येथे झालेल्या बैठकीत या रखडलेल्या नियुक्त्या लवकरच होण्याचे संकेत असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद कॉग्रेसच्या वाट्याला आले असल्याचे समजते.     

सध्या अस्तित्वात असलेली मंदिर समिती हि महायुती सरकारच्या काळात अस्तीत्वात आलेली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले कराड येथील अतुल भोसले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.तर सहअध्यक्ष म्हणून गहिनीनाथ औसेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अतुल भोसले यांनी मंदिर समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.                 

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली.राज्यातील सत्तांतरानंतर अस्तित्वातील मंदिर समितीची पुनर्र्चना होईल या हेतूने तीनही पक्षातील अनेकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न चालवले होते.तर राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसच्या नेत्यांकडून मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा दावा केला जात होता.तर शिवसेनेतील काही इच्छुकही या साठी प्रयत्नशील होते.मात्र महाविकास आघाडी सरकारच्या समन्वयकाच्या बैठकीत या समितीचे अध्यक्षपद कॉग्रेसला देण्याचा निर्णय झाला आहे.   

  गेल्यावेळी मंदिर समीतीच्या सदस्यपदी वर्णी लागावी या हेतूनेच काही महाराज मंडळींनी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या पालख्या रोखून धरल्यामुळे सामान्य भाविकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती.यंदा पुन्हा समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून काही सत्कार प्रेमी महाराज मंडळींकडून काय पावले उचलले जातात याकडे आता राज्यातील विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीत सत्ताधारी राजकीय नेत्यांशी जवळीक असलेल्यांची वर्णी लावत एकदोन सदस्यपदी महाराज मंडळींची वर्णी लावली जाते असा आरोप सातत्याने होत आला आहे.यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होणार का हे मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या नवीन अध्यक्ष,सह अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.                          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *