०३/०२/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना सांगली जिल्ह्यातून एक निळ्या रंगाचा आयशर टेम्पो क्रमानं एम एच ०९ सी यू ०००७ भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याच्या प्राप्त गोपनीय माहिती नुसार मे. साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर ली या पेढीची तपासणी केली. सदर पेढी गोपनीय माहितीनुसार सदर भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून आले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कारवाई वेळी सादर पेढीत संशयित भेसळीचे अंदाजे १०० लिटर दूध स्वीकारल्याचे व टेम्पोत संशयित भेसळीचे अंदाजे १८८० लिटर उपलब्ध होते. सदर संशयित भेसळीच्या दोन्ही दुधाचे नमुने विश्लेषणाकरिता घेऊन उर्वरित साठा जन आरोग्याचा विचार करिता जागेवर नष्ट करण्यात आला. अधिक तपासणी केली असता साबरकांथा पेढीत अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक तंत्रज्ञ नसल्याचे तसेच पेढी विनापरवाना असल्याचे दिसून आलेने पेढीस जागेवर व्यवसाय थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत श. कुचेकर यांनी सहकारी अन्न सुरक्षा आधिकरी योगेश देशमुख यांचे समवेत सहाय्यक आयुक्त (अन्न) प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. शिवाजी देसाई यांनी केले आहे.