ताज्याघडामोडी निविदा सूचना पंढरी वार्ता न्युज पोर्टल

आयुर्वेदिक डॉक्टरांना ऑपरेशन करण्याची मुभा देण्याच्या निणर्याविरोधात शुक्रवारी दवाखाने बंद 

 

        केंद्र सरकारने नुकताच आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या निर्णय घेतला असून त्यामुळे देशभरातील अलोपॅथिक डॉक्टर संतप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले असतानाच या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45000 डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण 1 लाख दहा हजार डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.     केंद्र सरकारच्या या निर्णयास विरोध दर्शविण्यासाठी ईएमए शी संलग्न असलेले सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद राहणार असून  मात्र तातडीने सेवा सुरु राहतील. यात आय.सी.यु., अपघातात सापडलेल्या रुग्णासाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा यांचा समावेश आहे.         

         याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे सांगतात की, “आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात 58 एलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. आयएमएने या विरोधात 11 डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. आयएमएचा हा लढा आयुर्वेदाविरोधी नाही. किंवा आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधीसुद्धा नाही. आमचा विरोध वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनवल्या जाणाऱ्या ‘मिक्सोपथी’ विरोधी आहे. या बंदमध्ये रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर्व तातडीने सेवा सुरु राहणार आहेत, मात्र सरकार ज्यापद्धतीने दोन पॅथींची सरमिसळ करत आहे त्याच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *