“इंटरनॅशनल ऑलंम्पियाड फाऊंडेशन (IOF) कडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश”
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये इंटरनॅशनल ऑलंम्पियाड फाऊंडेशन (IOF) कडून इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीतही दि.०६ व दि. ०८ नोव्हेंबर-२०२० रोजी गणित या विषयाची परीक्षा झाली. तसेच ०७ नोव्हेंबर २०२० रोजी इंग्रजी या विषयाची तर २७ नोव्हेंबर २०२० रोजी विज्ञान या विषयाची परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये दुसरीचे ४ विद्यार्थी, तिसरीचे ५ विद्यार्थी, चौथी चे ६ विद्यार्थी, पाचवीचे ५ विद्यार्थी, सहावीचे २ व सातवीचे २ व आठवीचे ३ असे या स्पर्धेमध्ये प्रत्येक विषयासाठी ५ विद्यार्थी सहभागी होवू शकतात. या नियमावलीत प्रशालेच्या एकूण २७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवून बाजी मारली.
या स्पर्धेमध्ये कु.समृद्धी नागनाथ लोखंडे (इंग्रजी मध्ये – रौप्य पदक), चि.शरयु सागर काळे (गणित मध्ये – रौप्य पदक), चि.कौंतेय कुबेर ढोपे (इंग्रजी मध्ये – रौप्य पदक), चि.मिहीर मकरंद बडवे (इंग्रजी व गणितामध्ये – रजत पदक), चि.पार्थ केदार मुळे (विज्ञान मध्ये- रजत पदक) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना सौ.प्रियांका माने, श्री.गहिनीनाथ कचरे व सौ.स्वाती बडवे या शिक्षकांनी मोलाचे ऑनलाईन मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री.गणेश वाळके व इतर सहशिक्षक व शिक्षिका यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःस्वी अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त मा.श्री.रोहनजी परिचारक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालींकरीता शुभेच्छा दिल्या.
