ताज्याघडामोडी

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचाला जीवे मारण्याची धमकी, कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल

महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये उपांत्य सामन्यात पंचानी दिलेल्या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला होता. त्यावरुन पंच मारुती सातव यांना जीवे मारण्यची धमकी मिळाली आहे. संग्राम कांबळे यांनी फोन करुन सातव यांना धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र केसरीचा प्रमुख दावेदार असलेला सिकंदर शेख तसेच महेंद्र गायकवाड यांच्यामधी रंगतदार लढत झाली होती. त्यावेळी चुकीचे गुण महेंद्र गायकवाडला दिल्या असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. सिकंदर शेखच्या प्रशिक्षकाने सुद्धा या गुणाल विरोध केला होता. त्यामुळे महाराष्ट्र केसरीतला निकाल एकतर्फी लागल्याच्या चर्चा महाराष्ट्रात होत्या. परंतु आता त्याच सामन्यांमध्ये पंच म्हणून पाहणारे मारुती सातव यांना जीवे मारण्यची धमकी मिळाली आहे. संग्राम कांबळे असे धमकी देण्याऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावरुद्ध कोथरुड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात अली आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतला ह्या सामन्याचा निकाल चर्चेचा विषय झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहा ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाल्या .या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम सामन्यांमध्ये कोल्हापूरचा सिकंदर शेख विरुध्द सोलापूरचा महिंद्र गायकवाड यांच्यामध्ये लढत झाली होती. कुस्तीत मुख्य पंच म्हणून मारुती सातव हे काम पाहत होते. या कुस्तीतील एका डावात महेंद्र गायकवाड याला चार गुण देण्यात आले होते. यामध्ये सिकंदर शेख यांच्या प्रशिक्षकाने थर्ड अंपायरकडे दाद मागितली होती. यात शिकंदर शेखला एक तर, महिंद्र गायकवाडला चार गुण देण्यात आले होते.

यावर मारुती सातव म्हणाले की, मी या पंच समितीचा अध्यक्ष असल्याने आज सकाळी मला एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. संग्राम कांबळे असे फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी मला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी मी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच संग्राम कांबळे याने रिव्हॉल्व्हर लोड करून संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मी पोलिसांत सरक्षणाची मागणी केली असल्याचे पंच सातव म्हणाले. मारुती सातव यांनी सदर तक्रार कुस्तीगीर समितीकडे केलेली आहे. त्यानुसार कुस्ती समितीचे सदस्य पैलवान संदीप भोंडवे यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून मारुती कांबळेवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *