

सिताराम महाराज साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रती मे.टन.2000/- प्रमाणे बँकेत जमा – कार्यकारी संचालक समाधान काळे
पंढरपूर – सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी चालु गळीत हंगाम 2020-2021 हा सुरु झालेला असून ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दि.16/12/2020 ते दि.31/12/2020 या पंधरवड्यामध्ये ऊस पुरवठा केला आहे त्या ऊस बीलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन.2000/- रुपये प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक शाखा पंढरपूर येथे जमा केलेला आहे.
तसेच चालु गळीत हंगामात आमचे कारखान्याकडे बिगर अॅडव्हान्स ऊस तोडणी वाहतुक करणाऱ्या वाहतुक कंत्राटदार यांना वाहतुक बिलावर 30 % व तोडणी बिलावर 19 % प्रमाणे कमिशन बिले विना कपात दररोज ऊसाची खेप झालेनंतर चेकने कारखाना साईटवर अदा केलेली आहे. तरी शेती विभागातील चिटबॉय यांचेकडून ऊस बिल पावती मिळाल्यानंतर आपली बिले घेण्यासाठी निशिगंधा सह.बँक लि,पंढरपूर यांचेकडे बँकेच्या सुट्या व्यतिरिक्त बँकेतून कारखान्याचे चिटबॉय यांचेकडून बिल पावती घेऊन बिले घेऊन जावीत. बँकेत खाते नसणाऱ्या शेतकऱ्यांनी खाते उघडुन बिले घ्यावित त्यासाठी केवायसी कागदपत्रे घेऊन बँकेत जावे. कारखान्याचे ऊस पुरवठा सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गाळपास देवुन सहकार्य करावे असे कार्यकारी संचालक समाधानदादा काळे यांनी सांगीतले.