Uncategorized

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील ७६ विकासकामांसाठी ५ कोटी निधी मंजूर – आ. आवताडे

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ – १२३८ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाकडे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता मतदारसंघातील ७६ कामांसाठी शासन अध्यादेशाद्वारे ५ कोटी निधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

आमदार आवताडे यांनी सांगितले आहे की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी आपण २५१५ – १२३८ योजनेअंतर्गत निधीची मागणी केली होती. सदर मागणीला राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्हा तत्कालीन पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन व संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. मंजूर झालेल्या या निधीतून मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये सभामंडप बांधणे, तालीम बांधणे, रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी बांधणे, रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे, सामाजिक सभागृह बांधणे, भूमिगत गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे इत्यादी विकास कामे मार्गी लागणार आहेत.

या योजनेतून पंढरपूर तालुक्यातील गावांची व मंजूर झालेल्या विकास कामांची यादी पुढीलप्रमाणे – रांझणी येथील खामकर वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, गोपाळपूर येथील पंढरपूर-मंगळवेढा रोड ते भानवसे वस्ती रस्ता सुधारणा व गोपाळ क्षिरसागर घर ते किसान लेंगरे वस्ती रस्ता सुधारणा करणे प्रत्येकी ५ लाख, मुंढेवाडी येथील भास्कर साळुंखे वस्ती ते त्र्यंबक पाटील वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, शिरगाव येथील हनुमंत पाटील ते संभाजी घाडगे वस्ती रस्ता सुधारणा करणे व शिरगाव-रांझणी रोड ते दादा घाडगे वस्ती रस्ता सुधारणा करणे प्रत्येकी ५ लाख, अनवली येथील अनवली ते शिरगाव रस्ता सुधारणा करणे व भाटघर कॅनॉल वर पूल बांधणे १० लाख, कासेगाव येथील सात मैल ते बाराभाई पाटील मळा रस्ता सुधारणा करणे १० लाख, कासेगाव येथील जुना कासेगाव रस्ता ते विश्वकर्मा गुमास्ता सोसायटी रस्ता सुधारणा करणे १० लाख, कासेगाव येथील पद्मिनी कोल्ड स्टोअरेज ते सुरवसे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कासेगाव येथील गुळ कारखाना ते नागनाथ कळकुंबे घर रस्ता सुधारणा करणे ९ लाख, कासेगाव येथील देशमुख मळा जुना कासेगाव रोड स्मशानभूमी बांधणे ८ लाख, खर्डी येथील खर्डी – तावशी ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळा खोरा रस्ता सुधारणा करणे १० लाख, टाकळी येथील रेल्वे लाईन ते अशोक देठे, महादेव देठे आयकॉन इन्स्टिट्यूट, भिवा देठे घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, कोर्टी येथील हसन शेख घर ते शाहबुद्दीन शेख वस्ती रस्ता सुधारणा करणे ९ लाख, कोर्टी येथील कराड रोड ते सदाशिव वाघमारे घर रस्ता सुधारणा करणे ९ लाख, वाखरी येथील वितरिका क्रमांक २८ उजनी कॅनॉल रस्ता सुधारणा करणे १० लाख, उंबरगाव येथील मारुती मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे ५ लाख, उंबरगाव येथील तिसंगी रस्ता ते शंकर जाधव घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, एकलासपूर येथील पंढरपूर-मंगळवेढा रोड ते पप्पू जाधव वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, तनाळी येथील गुंजेगाव रोड ते दिगंबर मोठे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कौठाळी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, बोहाळी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे ९ लाख, लक्ष्मी टाकळी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख.

मंगळवेढा तालुक्यातील गावांची व विकास कामांची यादी पुढीलप्रमाणे –

भोसे येथील पाटील वस्ती ते घाडगे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, भोसे-हंगिरगे रस्त्यावरून नागणेवाडी रस्ता सुधारणा करणे ५ लाख, नंदेश्वर येथे गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे १० लाख, जुनोनी येथील गोपाळवाडी खेड रस्ता सुधारणा करणे ५ लाख, पाटकळ येथील मोरे-ताड, चव्हाण-कोळेकर वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, महमदाबाद (हु) येथील दत्त मंदिर व हनुमान मंदिर सुशोभीकरण करणे २ लाख, महमदाबाद (हु) येथील आयालाप्पा होळकर वस्ती ते ओंकार गोरड वस्ती रस्ता सुधारणा करणे ३ लाख, महमदाबाद (शे)येथील श्री बसवेश्वर मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे ५ लाख, मानेवाडी येथील आमुंगेवाडी ते वाघमोडे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, पडोळकरवाडी ते आश्रम शाळा रस्ता ते शंकर कोळेकर घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, पडोळकरवाडी येथील मायाक्का मंदिर ते कोणीकणूर हद्दीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, लोणार – हुन्नूर पासून ते खडी क्रशर नवनाळे वस्ती ते सलगर वस्तीवरून बोबलाद हद्दीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, हुन्नूर येथील शालन कांबळे ते विक्रम पुजारी वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, हुन्नूर येथील होनमोरे महाराज मठ ते घाडगे वस्ती पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, फटेवाडी येथील मारुती मंदिर ते श्री सद्गुरु बैठक पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, तळसंगी फटेवाडी रस्त्यावरून गायकवाड, आवताडे व सुरवसे वस्ती पर्यंत जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, मरवडे येथील गायकवाड वस्ती रस्ता ते चडचण रस्ता सुधारणा करणे ५ लाख, निंबोणी येथील ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, आंधळगाव येथील ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, येळगी येथील ग्रामपंचायत जागेत गंगामाता सार्वजनिक वाचनालय इमारत बांधणे ७ लाख, तांडोर येथील ग्रामपंचायत जागेत स्वस्तिक सार्वजनिक वाचनालय इमारत बांधणे ८ लाख, आसबेवाडी येथील सुभाष मोरे वस्ती ते सलगर बु.ते शिवणगी रस्ता सुधारणा करणे ५ लाख, सलगर बु.येथील विदर्भ कोकण बँक ते कोळी, लोहार, सुतार गल्ली रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख, लवंगी, उमदी रस्त्यावरून कदम वस्ती जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, शिवणगी ते रुपनर- केंगार वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, सोड्डी ते बिराजदार वस्ती रस्ता खडीकरण करणे ५ लाख, येड्राव येथील सचिन माने वस्ती ते मारनूर वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, जंगलगी येथील भुयार रस्त्यावरून चोखंडे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, हिवरगाव ते जालिहाळ रस्ता सुधारणा करणे ५ लाख, रड्डे येथील ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, शिरनांदगी येथील भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय इमारत बांधणे ८ लाख, मारोळी येथील मेडीदार वस्ती ते हत्ताळी वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, चिक्कलगी-जंगलगी रस्त्यावरून शेती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, चिक्कलगी ते जुना हत्ताळी वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, भाळवणी येथील निंबोणी रस्त्यावरून ढगे वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, खोमनाळ येथील ग्रामपंचायत ऑफिस ते माने घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, रहाटेवाडी येथील निवास पवार घर ते सुनील पवार घरापर्यंत रस्ता करणे ७ लाख, रहाटेवाडी येथील मुंढेवाडी रस्ता बाळू पवार घर ते नवनाथ पितांबर पवार रस्ता मुरमीकरण करणे ५ लाख, चोखामेळा नगर येथील विमल गायकवाड घर ते आसबे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, बठाण येथील गणेश बेदरे ते सुबराव बेदरे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, माचणूर येथील मुंढेवाडी रस्ता ते नानासाहेब हरी डोके घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, लेंडवे चिंचाळे येथील पैलवान दादासाहेब लेंडवे वस्तीवरील श्री सिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधणे ५ लाख, लक्ष्मी दहिवडी – शेलेवाडी रस्त्यावरून जालिंदर पाटील वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, मारापूर येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, महदाबाद – गुंजेगाव रोड ते दत्ता मेटकरी राजाराम मेटकरी घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, भालेवाडी येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ५ लाख, घरनिकी येथे मोहन माळी ते अशोक क्षीरसागर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, मल्लेवाडी ते दामोदर गोडसे घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, अरळी नंदूर शिवेवरती गुरंगे शेती येणपे वस्ती रस्ता सुधारणा करणे ६ लाख, सिद्धापूर गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ७ लाख, हुन्नूर ते लोणार रस्ता सुधारणा करणे, २५ लाख, माळेवाडी येथील रामय्या स्वामी ते हुलजंती माळेवाडी रस्तेपर्यंत सुधारणा करणे ५ लाख इत्यादी कामे केली जाणार आहेत.

सदर सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार असून नियोजित कामांचा आराखडा तयार करून लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच आपल्या गावातील मंजूर कामे सुरळीत व वेळेवर मार्गी लावण्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारण आड न आणता संबंधित ग्रामपंचायतींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा येथे सादर करावीत असे आवाहन जनसंपर्क कार्यालय यांचेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *