ताज्याघडामोडी

मेंढापूर येथे जुगार खेळणाऱ्या ८ जणांविरोधात करकंब पोलिसांची कारवाई

मेंढापूर येथे जुगार खेळणाऱ्या ८ जणांविरोधात करकंब पोलिसांची कारवाई

१ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात 

पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मेंढापूर येतील ज्योतिबा मंदिराजवळील फॉरेस्ट हद्दीत ८ इसम ५२ पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी अवैध व्यवसाय आढळून आल्यास कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार प्रभारी पोलीस अधिकारी करकंब यांनी दिलेल्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या कारवाईत ५२ पानांचा जुगार खेळणाऱ्या ८ इसमांविरोधात कारवाई करीत १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
               या बाबत करकंब पोलीस ठाण्यांतर्गत शोध पथकात कार्यरत असलेले पो.शि. सज्जन आबाराव भोसले यांनी सरकारच्या वतीने दाखल केलेल्या फिर्यादींनुसार मेंढापूर गावातील ज्योतीबाचे देवळाजवळील फाँरेस्टमध्ये काही इसम गोलाकार बसून 52 पानी पत्यावर जूगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पो ना 518 सुळ, पो ना 1883 वाघमारे, पो शि 835 लेंगरे यांच्यासह कारवाईसाठी गेल्यानंतर सदर 8 इसम गोलाकार बसून जूगार खेळत असताना दिसले. सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना गराडा घालून पकडले असून एक इसम पळून जाण्यात यशस्वी ठरला.सदर इसमांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे 1. मोहन रामदास सुतार, वय-47 वर्षे, 2. संजय नागनाथ पवार, वय-48 वर्षे 3.शरद विठठल सुतार, वय-36 वर्षे 4. संजय संदिपान जाधव, वय- 39 वर्षे, 5. नागनाथ पंढरीनाथ खंडाळे, वय- 33 वर्षे, 6. कुलदीप हणमंत पाटोळे वय-28 वर्षे 7. संजय कांतीलाल मोरे, वय- 30 वर्षे 8. प्रमोद भिकाजी झेंडे हा पळून गेला आहे येणेप्रमाणे नावे सांगीतले असून तेथेच जवळ एकूण 06 मोटारसायकली लावलेल्या मिळून आल्या आहेत.1) रु.00.00/-. दोन 52 पानी पत्याचे लाल काळया रंगाचे डाव जू वा कि अ.2) रु 4200/- रोख रक्कम त्यात अ क्र 1 याचेकडून रु.800/-, अ क्र 2. याचेकडून रु. 500/-, अ क्र 3 याचेकडून रु.700/- अ क्र 4 याचेकडून रु.300/- अक्र 5 याचेकडून रु.700/- अ क्र 6 याचेकडून रु.300/- अ क्र 7 याचेकडून रु.1000/-असे 500, 200, 100, 50 व 20 च्या चलनी नोटा.3) रु.30000/- त्यात नागनाथ पंढरीनाथ खंडाळे याची एक बजाज डिस्कव्हर मो सा तीचा आर टी ओ नं. एम एच 42 यु 6887 असा असलेला जू वा कि अ.4) रु.30000/- त्यात मोहन रामदास सुतार याची हिरो होंडा फशन कंपणीची मो सा तीचा आर टी ओ नं. एम एच 13 बी बी 3063 असा असलेला जू वा कि अ.5) रु.30000/- त्यात संजय कांतीलाल मोरे याची होंडा शाईन कंपणीची मो सा तीचा आर टी ओ नं. एम एच एम एच 13 बी वाय 8336 असा असलेला जू वा कि अ.6) रु.30000/- त्यात संजय नागनाथ पवार याची होंडा शाईन कंपणीची मो सा तीचा आर टी ओ नं. एम एच 13 सी सी 1238 असा असलेला जू वा कि अ.7) रु.30000/- त्यात शरद विठठल सुतार याची बजाज डिस्कवर कंपणीची मो सा तीचा आर टी ओ नं. एम एच 13 ए सी 9213 असा असलेला जू वा कि अ.8) रु.30000/- त्यात प्रमोद मोहन झेंडे याची बजाज प्लटिना कंपणीची मो सा तीचा आर टी ओ नं. एम एच ए जी 3948 असा असलेला जू वा कि अ.रु.184200/- येणेप्रमाणे वरील वर्णनाचा मूददेमाल मिळून आल्याने तो पो ना 518 दादासो सूळ यांनी जूगार गून्हयाचे कामी जप्त करुन ताब्यात घेतला आहे.
    वरील इसम क्र 1 ते 8 यांचेविरुदध महाराष्ट्र जूगार बंदी अधि कलम 12-अ प्रमाणे करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *