

पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत पुनर्वसन गावठाणातील मुरूम काही अज्ञात लोकांकडून सातत्याने टिपर व जेसीबीच्या वापर करून चोरून नेला जात आहे.त्या मुळे या पुनर्वसन गावठाणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.सदर गावठाण हे मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला असून त्यामुळे येथील नागिरकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
सदर मुरूम चोरीमागे काही धनदांडग्यांचा हात असल्याची चर्चा असून या मुरूम चोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.त्यामुळे सदर पुनर्वसन गावठाणाच्या हद्दीतील अवैध मुरूम उपसा थांबवावा व या प्रकरणी अधिक चौकशी करून मुरूम चोरी करणाऱ्यांची वाहने जप्त करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनसेवा प्रतिष्ठानने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन देताना जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माने,नारायण भुई,महादेव फराटे,नाथाजी पिलवे,मयूर माने,कल्याण लेंडवे आदी उपस्थित होते.