Uncategorized

पंढरपुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची लाखोंची फसवणूक

पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बाळ प्रभाकर कुंभार यांचे यांचा इमारत बांधकाम व आर्किटेक्टचा व्यवसाय असून त्यांना व्यवसायासाठी आवश्यक वस्तु इत्यादीची खरेदी करणे इत्यादी सर्व कामे पाहतो मला इटर लकिंग ब्रिक्स सिमेट विट वनवण्याची मशीन खरेदी करण्याची होती. कोल्हापूर येथील महादेव नामदेव चव्हाण हे बाळ कुंभार यांच्या कार्यालयात अरुण आसाराम परांडे ( पाटील ) वय अंदाजे 40 यांना घेवुन आले व अरुण आसाराम पंरांडे यांची इंटर लकिंग ब्रिक्स बनवण्याची कंपणी आहे. व सदर कंपणीचे नाव डिझायर इंडिया इंडस्ट्री सर्विस सेंटर या नावाची कंपणी आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली.अरुण आसाराम परांडे ( पाटील ) याने बाळ कुंभार याना सदर मशीनचे पामप्लेट ही दाखविले. सदरचे मशीन इतर ग्राहकांनाही दिल्याची खात्री पटवुन दिली. व मशीन जाग्यावर पोच करण्याची हमी ही दिली.
सदर मशिनची किंमत रक्कम रु. 5,69,940 /- ठरली. सदरचा व्यवहार ठरल्यानंतर फिर्यादी बाळ कुंभार यांनी सदर अरुण परांडे यास तीन टप्प्यात २ लाख रुपये इतकी रक्कम अदा केली.मशीन तुम्हाला एक महिण्यानंतर पाठवुन दिली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले होते. सदरची मशीन बनवायची प्रक्रिया चालु आहे असे आरोपी सतत सांगत होता. तथापी सप्टेबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात मशीन न मिळाल्याने मी मो.नं. 9851859999, 9852341111 वर संपर्क करुन तुम्ही मशीन वेळेत दिली नसल्याने तुम्ही मला पैसे माघारी द्या असे फिर्यादीने सांगीतले. तथापी पैसे मागीतल्यानंतर अरुण आसाराम परांडे याने फोन उचलणे बंद केले. त्यामुळे सदर कंपणीबाबत व अरुण आसाराम परांडे बाबत संशय निर्माण झाल्याने फिर्यादी हे स्वतः औरंगाबाद येथे जावुन कंपणीची चौकशी केली असता सदरची कंपणी ब-याच दिवसापासुन बंद असल्याचे समजले नंतर त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *