Uncategorized

  खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लाऊड  क्लीनिक मशीनचे आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते उद्घाटन    

 

 खर्डी तालुका पंढरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लाऊड क्लिनीक मशीन आल्यामुळे एकाच वेळी 23 टेस्ट होणार आहेत. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीन खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवण्यात आले आहे. दररोज जास्त ओपीडी असणाऱ्या खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकाच वेळी 23 टेस्ट होणारी  मशीन आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील रुग्णांच्या नियमित तपासणी बरोबर गरोदर, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुली, मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याचबरोबर लसीकरण, बाळंतपण कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. रक्तातील शर्करा, हिमोग्लोबिन तपासणी महत्त्वाची असते. यासाठी ही मशीन महत्त्वाचे ठरणार आहे. सुरक्षित मातृत्व व बालजीवीत्व हा उद्देश गाठण्यासाठी नवजात बालकांचे जन्मताच संरक्षण करण्यासाठी हे मशीन उपयोगी ठरणार आहे.  याचे प्रशिक्षण ही खर्डी येथील प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाहणी करून दुरूस्तीसाठी 10 लाख रू निधी आमदार फंडातून देण्याची घोषणा केली.यावेळी आमदार प्रशांत परिचारक पं स. सभापती आर्चना व्हरगर उपसभापती सौ. भोसले, वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय साळुंखे युवा नेते प्रणव परिचारक सरपंच मनिषा सव्वाशे उपसरपंच शरद रोंगे माजी सरपंच रमेश हाके संचालक सुरेश आगावणे नारायण रोंगे गटातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

एटीएम सारखी क्राऊड मशिनची रचना आहे. या मशिनसमोरील स्टॅन्डवर उभारल्यावर महिलेची उंची वजन क्षणात कळते.त्याचबरोबर शक्ती, रक्तातील आक्सिजन, छातीचे ठोके,रक्तदाब, इन्फ्रारेड, तापमापक, ब्लडशुगर, प्रेशर,बाॅडिमास ,चरबी कॅलरीज, कॅल्शियम, ई 15,बीएमडब्लू अशा 23 पॅरामीटरच्या तपासण्या दहा मिनिटात केल्या जातात. या तपासण्याचे रेकॉर्ड रूग्णांच्या नावे संगणकावर नोंद होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *