गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड चोरमळा येथे वाळूचोरांवर तालुका पोलिसांची कारवाई

 

पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावरील अनेक गावे हे वाळू चोरीचे हॉटस्पॉट झाले असून काही गावाच्या हद्दीतील वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कारवाई करीत आलेले असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी वाळू उपसा सुरु होत असल्याचे अनेकवेळा झालेल्या कारवायांतून सिद्ध झाले आहे.९ डिसेंबर रोजी  अजनसोंड चोरमळा येथील भीमा नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी  कारवाई करीत भिमानदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारा ट्रक्टर व डंपिग ट्रेलर ताब्यात घेतला आहे.तर पोलीस आल्याचे पाहताच वाळूचोर पसार झाले.
      या बाबत चळे बिट हवालदार अमित भानुदास ताटे नेम.पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दि.09/12/2020 रोजी 19/00 वा.चे सुमारास मी ,सपोनि खरात ,पोहेका/1743चवरे ,पोना/1801क्षिरसागर ,पोका/1981वाघमारे हे अवैदय धंदयावर कारवाई करण्याकरीता पेंट्रोलिंग करत असताना अजनसोंड चोरमळा येथील भीमा नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे गेले असता पोलीस आल्याचे पाहून वाळू चोर पसार झाले.या कारवाईत 1) 3,04,000/-रु त्यात एक निऴे रंगाचा न्यु हलंड 3630 कंपनीचा ट्रँक्टर त्याचा नंबर MH13- AJ 2713 असा असलेला व त्यास जोडलेली एक बिगर नंबरची लाल रंगाची डंपिग ट्राँली तसेच यातील आरोपीने भिमा नदीपात्रातुन उत्खनन करुन डंपिग टेलर मध्ये भरुन नदीपात्रात खाली केलेले एक ब्रास वाळु किंमत 4000/-रूपये असे एकुण कि.अंदाजे 3,04,000/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.सदर ट्रँक्टरचा अज्ञात चालक याचेविरुध्द भा.दं.वि.379 , सह गौण खनिज कायदा 1978 कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *