ताज्याघडामोडी

शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात;         कॅनरा बँकेचे गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेडने केले बोंबाबोंब आंदोलन

शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात;        
कॅनरा बँकेचे गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेडने केले बोंबाबोंब आंदोलन

पंढरपूर (विशेष प्रतिनिधी): शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असुन आज खेडभाळवणी येथील शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडने कॅनरा बँकेचे गहाळ कारभाराविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.

खेडभाळवणी येथील काही शेतकर्‍यांनी मे 2018 मध्ये दिड लाखाच्या आत कॅनरा बँक, पंढरपूर यांचे पिक कर्ज घेतलं होते. सदर शेतकरी हे भिमा नदी  पुरग्रस्त प्रवण क्षेत्रात येतात. परंतु दि.31/03/2019 ते 30/09/2019 या कालावधीत सदर शेतकरी थकीत कर्जदार असल्याने त्यांना महात्मा जोतिराव फुले कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला नाही. कॅनरा बँकेचे मनमानी व गहाळ कारभारामुळे त्यांनी या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याची माहिती जाणीवपूर्वक  शासनास सादर केली नाही. हि जबाबदारी बँकेची असताना सुद्धा अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे सदर शेतकरी यांना नविन कर्ज घेण्यासाठी अडचणी येत आहेत. वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही सदर शेतकर्‍यांना न्याय मिळत नसल्याने आज शुक्रवार दि. 13/11/2020 रोजी संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने शेतकर्‍यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सकाळी11 वा. कॅनरा बँकेसमोर बोंबाबोंब  आंदोलन केले.

येत्या 8 दिवसात बँकेचे प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन संबंधीत शेतकर्‍यांचे कर्ज  माफ न झाल्यास पुढील आंदोलन उग्र स्वरुपाचे करणार असल्याचे निवेदन कॅनरा बँकेचे शाखाधिकारी व सहाय्यक निबंधक यांना दिले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष. शिवश्री.बाळासाहेब बागल, पुणे विभागाचे अध्यक्ष शिवश्री.किरणराज घाडगे, शहर अध्यक्ष स्वागत कदम, विश्वजित भोसले, सुमित शिंदे, स्वप्निल गायकवाड, सोलापूर जिल्हा संघटक- शिवश्री.प्रमोद जगदाळे, तावशीचे अध्यक्ष शिवश्री.अमोल कुंभार, गादेगावचे आकाश मांडवे, प्रविण पवार व खेडभाळवणी येथील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *