ताज्याघडामोडी

सीताराम महाराज साखर कारखान्यावर आरसीसी नूसार कारवाई 

सीताराम महाराज साखर कारखान्यावर आरसीसी नूसार कारवाई 

१४ कोटी ९० लाखाच्या वसुलीसाठी ४५ हजार क्विंटल साखरेचा होणार लिलाव

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या अधिपत्याखालील खर्डी ता.पंढरपूर येथील सीताराम महाराज साखर कारखान्याने गाळप हंगाम २०१८-१९ मधील एफआरपीच्या १४ कोटी ९० लाखाच्या वसुलीसाठी या कारखान्यावर आरसीसीची कारवाई करीत या साखर कारखान्याच्या सुमारे ४५ हजार क्विंटल साखरेचा दिनांक १८ नोव्हेंबर रोजी लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रकटन प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडून करण्यात आले आहे.      

 सीताराम महाराज साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकविल्यामुळे या कारखान्याच्या व्यवस्थापना विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसून येत होती.तर जनहित शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी या कारखान्यावर जमीन महसूल अधिनियम नुसार आरसीसीची कारवाई करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी शासनाने वसूल करून दयावी यासाठी आंदोलने,उपोषणे करण्यात आली होती.   

      पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशान्वये सीताराम महाराज साखर कारखान्याची ४५ हजार ३०१ क्विंटल साखर जप्त करण्यात आली असून या जप्त साखरेचा लिलाव दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प्रांताधिकारी कार्यलयात होणार आहे.सदर साखरेची विक्री हि किमान बोली दर प्रतिक्विन्टल ३१०० अधिक ५ टक्के जीएसटी सह असून यात सहभागी होण्यासाठी ५ लाख रुपये रकमेचा डीडी लिलावापूर्वी जमा करणे बंधनकारक आहे.लिलावाच्या अटी व शर्थी या कार्यलयात पहावयास मिळतील. 

   या कारवाईमुळे सीताराम महाराज साखर कारखान्याकडे गेल्या दोन वर्षांपासून एफआरपीची रक्कम थकीत असलेल्या ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *