ताज्याघडामोडी

शरद पवारांशी दोन मिनिटांची भेट अन् कल्याण काळेंचा प्रश्न निकाली ?

शरद पवारांशी दोन मिनिटांची भेट अन् कल्याण काळेंचा प्रश्न निकाली ?

सहकार शिरोमणी कारखान्यास शासनाकडून थकहमी मंजूर

भीमा सहकारी साखर कारखान्यास देखील मिळाला मोठा दिलासा 

राज्य शासनाने आज राज्यतील आणखी ३२ सहकारी साखर कारखानांची थकहमी मंजूर केली असून यामध्ये कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी साखर कारखान्यास १४ कोटी ५२ लाख तर भीमा सहकारी साखर कारखान्यास २० कोटी २२ लाख थकहमी मंजूर करण्यात आली आहे.गट आठवड्यातच राज्य शासनाने राज्यातील जवळपास ९० सहकारी साखर कारखान्यांना थकहमी मंजूर केली होती.यामध्ये सहकार शिरोमणी व भीमा सहकारी साखर कारखान्याचा समावेश नव्हता.त्यावेळी या दोन्ही साखर कारखान्यास किती थकहमी दिली जावी याबाबत उहापोह सुरु असल्याचे समजले होते. 

   मात्र प्रत्यक्ष थकहमीच्या यादीत नाव नसल्यामुळे सहकार शिरोमणी आणि भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये व कामगारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.तर याच थकहमीच्या प्रश्नासाठी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांनी शरद पवार हे पंढरपूर दौऱ्यावर असताना आ.भालकेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्याचा   भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.पुढे कल्याणरावांची अल्पभेट घडून आली आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचा थकहमीचा प्रश्न निकाली निघाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.  

    भीमा सहकारी साखर कारखान्याचे बहुतांश कार्यक्षेत्र हे पंढरपूर तालुक्यात असून त्यामुळे या कारखान्याकडेही उसउत्पादकांचे लक्ष लागले होते.मध्यंतरी या कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी  महाडिक पुन्हा राष्ट्रवादीत परतणार अशी चर्चाही झाली होती परंतु हि भेट हि केवळ भीमा सहकारी साखर कारखान्यास आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी होती असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला होता.महाडिक चेअरमन असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यासही थकहमी मिळाल्याने हे दोन्ही साखर कारखाने आता सुरु होण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे अतिरिक्त उसउत्पादनाचा प्रश्न काहीसा निकालात निघत पंढरपूर तालुक्याला दिलासा मिळणार आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *