ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये ‘शिक्षणोत्सव ‘

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाची विविध कार्यक्रम सादर करून उत्साहात सुरुवात करण्यात झाली. “कर्मयोगी विद्यानिकेतन म्हणजे वेगळेपणा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे उत्तम दालनच आहे.” 

कोरोनाच्या महामारी नंतर प्रथमच ऑफलाईन नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे तर आहे पण आरोग्याची काळजी सुद्धा आहे.अशी पालकांची द्विधा मन:स्थिती असली तरी पहिल्याच दिवशी प्रशालेच्या सर्व शिक्षक वृंद यांनी गाणी, नाटके, डान्स, एकपात्री तसेच महिला शिक्षकांनी लेझीम खेळून व औक्षण करून विद्यार्थ्यांना शालेय वातावरणात समावेश करून घेतले.

यावेळी संस्थेचे चीफ ट्रस्टी श्री रोहनजी परिचारक यांनी संबोधित करताना म्हंटले की विद्यार्थ्यांना शिक्षण देताना मूल्ये रुजविणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *