ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल मंदिरे समितीने  तर्फे माफक दरात आरोग्य तपासणी व उपचार केंद्र सुरु करावे

श्री विठ्ठल मंदिरे समितीने  तर्फे माफक दरात आरोग्य तपासणी व उपचार केंद्र सुरु करावे 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी 

मार्च, 2020 पासून आपल्या देशामध्ये कोरोना  या महाभयंकर रोगाने धुमाकूळ घातलेला आहे. हा रोग आता ग्रामीण भागातील घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. गेल्या सहा महिन्यापासून देशामध्ये डॉक्टर कमी असल्यामुळे सर्व जनता बेजार झालेली आहे. त्यात पावसाचा अतिरेक झाल्या मुळे शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे,  उद्योग व्यवसाय बंद पडलेले आहेत.  यामुळे लोकांकडे आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या आशा प्रकारची वाईट परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे. या अशा काळात पंढरपूरचा श्री पांडुरंग हा या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे आराध्यदैवत आहे ज्याप्रमाणे दुष्काळाच्या परिस्थिती संत दामाजीपंतांनी ज्वारीची कोठारे उघडून लोकांचा जीव वाचवला आणि त्याची भरपाई देण्यासाठी स्वयंम श्री विठ्ठलाने अवतार घेऊन त्यांचे रीन चुकते केले. सध्या कोरोना रोगामुळे खूप भयंकर परिस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रातील गोरगरबी, कष्टकरी, कामगार, शेतकरी, मजूर अशा सर्व स्तरातील जनतेवर भयंकर संकट आलेले आहे. कित्येक लोक स्वतःकडे असलेल्या जमीनी,जागा, घर, मौल्यवान वस्तू विकून आपल्या कुटुंबाचे पोट भागवत आहेत त्यात स्वतःच्या आरोग्य काळजी घेण्यासाठी तसेच दवाखान्याचा खर्च भगवण्यासाठी ही लागणारे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे लोक मृत्यू पावत आहेत. अशा परिस्थितीत विठ्ठलमंदिर समितीतर्फे आरोग्याच्या सर्व तपासण्यासाठी सिटीस्कॅन, सोनोग्राफी, रक्त लघवी चेक अप, आर सी टी टेस्ट आणि इतर आजार वरती माफक दरात उपचार देण्यासाठी आरोग्य केंद्र उभा करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल  निवेदनाद्वारे केली आहे. 

   ज्या पद्धतीने श्री विठ्ठल दामाजीपंतांचे पाठिशी उभे राहिले अशाच पद्धतीने या कोरोनारोगाच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब भक्तांच्या  माऊलींच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे बनले आहे.
यामुळे वरील मागणीप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांचेकडून पंढरपूर येथे एका अद्यावत आणि भव्य असं माफक दरातील आरोग्य उपचार केंद्र उभारण्यात यावे अशी प्रतिक्रिया यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.  

  हे निवदेन देताना सचिन पाटील,शहाजहान शेख,रणजित बागल,अप्पा चोरमले,अक्षय महारनवर,नगरसेवक प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *