ताज्याघडामोडी

वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात आहोत,चांगलं फाडून वाईट बघण्याचा कोणी प्रयत्न करू नये- आ भालके 

वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात आहोत,चांगलं फाडून वाईट बघण्याचा कोणी प्रयत्न करू नये- आ भालके

राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार हे गतसप्ताहात सात्वनपर भेटीसाठी पंढरपूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी या दौऱ्यात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना आ. भालकेच्या घरी खा. शरद पवार यांच्या भेटीसाठी प्रवेश मिळाला नाही याची जोरदार चर्चा रंगली होती.

मात्र या घटनेबाबत आ. भालके यांनी खालील प्रमाणे सविस्तर खुलासा केला आहे.    

         देशाचे नेते आदरणीय खा.श्री शरदचंद्रजी पवार साहेबांचा सांत्वनपर पंढरपूर तालुका दौरा पार पडला. या दौर्‍यामध्ये कै.सुधाकरपंत परिचारक, कै.राजुबापू पाटील, कै.रामदास महाराज जाधव यांचे कुटूंबातील वारसांना सांत्वन केले. मयत झालेले नेते व महाराजांचे आदरणीय पवार साहेबांचे अनेक वर्षापासून जवळचे संबंध होते. आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी मयत झालेल्यांच्या वारसांना सांत्वन करण्यासाठी जात असतात तर काही ठिकाणी फोनवरून सांत्वन करून त्यांचे दुःखात सहभागी होत असतात.
काही वर्तमान पत्रामध्ये आदरणीय पवार साहेबांचा पंढरपूर दौर्‍याबाबत बातमी देऊन राजकारण करीत असल्यामुळे याबाबत मी स्वतः खुलासा करीत आहे.
               आदरणीय पवार साहेबांच्या दौर्‍यामध्ये भोसे येथे आमदार श्री भारत भालके उपस्थित होते ही बाब लिहिणारालाच कशी योग्य वाटली? कारण आदरणीय पवार साहेब हे आमचे नेते असून मी स्थानिक लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी स्वतः त्यांचा पंढरपूर तालुका दौर्‍याचे नियोजन केलेले होते. त्यामुळे मी आदरणीय पवार साहेबांबरोबर संपूर्ण दौर्‍यामध्ये असणे ही माझी जबाबदारी आहे.
               पंढरपूर तालुक्यातील मान्यवरांचे आकस्मिक निधन होणे हे दुःख सहन न होणारे आहे. आदरणीय पवार साहेबांच्या दौर्‍यामध्ये पंढरपूर येथील माझे निवासस्थानी जेवणासाठी मी विनंती केलेली होती. भोसे येथे मी स्वतः श्री कल्याणराव काळे यांना जेवणासाठी निमंत्रण दिलेले होते. श्री कल्याणराव हे जरी भा.ज.पा. पक्षामध्ये असले तरी ते आमच्या विठ्ठल परिवारातील एक ज्येष्ठ सहकारी आहेत.
                सदर दौर्‍यामध्ये जिल्ह्यातून येणार्‍या पदाधिकारी यांची यादी पोलीस खात्याने मागवून घेतली होती व तालुक्यातील पदाधिकार्‍यांची यादी दिलेली नव्हती. मी स्वतः साहेबांबरोबर असल्यामुळे माझे काही सहकारी माझे निवासस्थानाच्या बाहेर राहिले त्यामध्ये श्री कल्याणराव काळे, श्री दिनकरबापू पाटील, श्री विजयसिंह देशमुख यांची मी स्वतः दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्यामुळे निशकारण चांगलं फाडून वाईट बघण्याचा कोणी प्रयत्न करू नये. या सर्वांना पोलीसांनी सोडले नसल्यामुळे ते घराजवळून निघून गेल्याचे मला समजल्याबरोबर या सर्वांना मी साहेबांसमोरच पुन्हा त्यांना फोन करून साहेबांना भेटण्यासाठी विनंतीही केली आहे. त्यामुळे गैरसमज करून देऊ नये. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात आहोत हे माहित असावे.

– आ. भारत भालके  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *