ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई 

पंढरपूर शहरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई 

पिकअप सह १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात 

पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागेच्या नदीपात्रातून होणाऱ्या अवैध उपशावर वारंवार कारवाई होत असल्याचे दिसून येत असतानाच गेल्या काही दिवसात चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शहरानजीकच्या चंद्रभागेच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थंडावला होता. मात्र चंद्रभागेच्या पाणी पातळी कमी झाल्याचे पाहून काही ठिकाणी पुन्हा अवैध वाळू उपसा करणारे सक्रिय झाले असल्याचे समजताच पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत विशेष पोलीस पथकाकडून कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पिकअप वाहनासह १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.   

      या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली  कार्यरत विशेष पथकातील पोलीस कर्मचारी व सदर प्रकरणातील फिर्यादी पो.कॉ.इंद्रजित सुर्वे यांच्यासह पो.कॉ.शिवशंकर हुलजंतीपो.कॉ.घाटगे व पोलीस नाईक संदीप पाटील हे आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी शहरात गुन्हे कामी गस्त घालत असताना ठीक ०७ वाजता ते कॉटेज हॉस्पिटल परिसरात आले असता अवैध वाळू उपसा करून येण्याचा संशय असलेले एक पीक अप वाहन येताना दिसून आले.पोलीस आल्याचे पाहताच तीन इसम सदर वाहन सोडून पळून गेले. सदर वाहनात डोकावून पाहिले असता सदर वाहन हे विना परवाना अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.या बाबत ताब्यात घेण्यात आलेला इसम रोहित कोळी रा. व्यास नारायण झोपडपट्टी याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने  पळून गेलेल्या इसमाची नावे माहिती नसल्याचे नसल्याचे सांगितले.

    या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहित कोळी रा. व्यास नारायण झोपडपट्टी याच्यासह पिकअप मालक कृष्णा नेहतराव व अज्ञात दोन इसमाविरुद्ध भादंवि कलम ३७९ सह गौण खनिज कलम कायदा ४(१)४(क)१,२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *