ताज्याघडामोडी

इंडीया पोस्ट पेमेंट बॅकेतून विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती पंढरपूर विभागतील सर्व पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध

इंडीया पोस्ट पेमेंट बॅकेतून विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

पंढरपूर विभागतील सर्व पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध

पंढरपूर दि(25):- इंडीया पोस्ट पेमेंट बँक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती  आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तसेच गावातील प्रत्येक पोस्ट कार्यालयात नागरिकांना बँकींग  सेवा मिळणार असल्याची माहिती  पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक एन. रमेश, यांनी दिली.

राज्य सरकारकडून मागासवर्गीय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळते. यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते खाते असणे गरजेचे आहे. इंडीया पोस्ट पेमेंट बँक ही सुध्दा राष्ट्रीयकृत बँक असून, मोबाईलवर काही वेळातच विद्यार्थ्यांना  इंडीया पोस्ट पेमेंट बँकेच्या ॲपव्दारे खाते उघडता येते. पंढरपूर डाक विभागातील सुमारे 750 विद्यार्थ्यांनी आपले खाते उघडले असून, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, करमाळा, माळशिरस आणि माढा तालुक्यातील  मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती साठी पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी खाते उघडवावे असे आवाहन अधिक्षक एन. रमेश, यांनी केले आहे.

पंढरपूर डाक विभागातील प्रत्येक गावामधील पोस्ट कार्यालयात इंडीया पोस्ट पेमेंट बँक सेवा देणार आहे.  विद्यार्थ्यांना, नागरिकांना, व्यावसयिकांना गावातच राष्ट्रीयकृत बँकेची सेवा मिळणार आहे. या बँकिंग सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा. बँक खाते उघडण्यासाठी  आधारकार्ड व मोबाईल नंबर आवश्यक असून,  आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात बँक खाते उघडावे. असे आवाहन  अधिक्षक एन. रमेश यांनी  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *