ताज्याघडामोडी

दामाजी कारखाना सहा लाख मे.टन गाळप करणार- समाधान आवताडे दामाजी शुगरचा 28 वा बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न

दामाजी कारखाना सहा लाख मे.टन गाळप करणार- समाधान आवताडे
दामाजी शुगरचा 28 वा बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न

मंगळवेढा – दामाजी कारखान्याच्या जास्तीत जास्त सभासदांनी आपला संपूर्ण ऊस दामाजीसच घालावा. चालु गळीत हंगामामध्ये कारखाना सहा ते साडे सहा लाख मे.टन ऊस गाळप हंगाम करुन यशस्वी पध्दतीने पार पाडणेसाठी कारखान्याचे संचालक मंडळ प्रयत्नशील असून  सर्व तोडणी ठेकेदार व कामगारांच्या  सहकार्याने गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पार पडेल असा विश्वास असल्याचे मत दामाजी कारखान्याचे चेअरमन मा.समाधानदादा आवताडे  यांनी व्यक्त केले.
      श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या  गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन कारखान्याचे चेअरमन मा.समाधानदादा आवताडे यांचे शुभहस्ते व व्हाईस चेअरमन मा.अंबादास कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात पार पडला.तसेच सुरुवातीस सकाळी 9.00 वाजता श्री.सत्यनारायण महापूजा कारखान्याच्या संचालिका सौ.कविता भारत निकम व त्यांचे पती श्री. भारत सौदागर निकम या उभयतांचे शुभहस्ते करण्यांत आली.
श्री संत दामाजी कारखान्याच्या 28 व्या  गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कार्यक्रमात आवताडे पुढे म्हणाले की, प्रत्येक वर्षी कारखान्यास नवीन अडचणीस सामोरे जावे लागत आहे. आपल्या कारखान्याच्या मशिनरीच्या सर्व दुरुस्त्या झालेल्या आहेत. चालु गळीत हंगामात प्र.दिन 4000 मे.टन याप्रमाणे गाळप करु शकतो अशा प्रकारची सर्व यंत्रणा तयार आहे.सध्या कोरोनाच्या महामारीचा जास्तीत जास्त फैलाव कारखानदारीवर होईल याची जाणीव ठेवून आपल्या भागातीलच ऊस तोडणी वाहतुक  यंत्रणा कारखान्याचे कर्मचारी व संचालक मंडळानी भरती केली आहे. गतवर्षी आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही इतर कारखाने चालू झाले नाहीत, परंतु दामाजीने दुष्काळी परिस्थितीमध्ये तोडणी वाहतुक यंत्रणेवरील अडचणीवर मात करुन 1,62,000 मे.टन गाळप केले.
आपण आपल्या कारखान्याची सन 2019-20 ची ऊस उत्पादक शेतक­यांची रुपये 2247/- एफ.आर.पी. पूर्ण केली असून दोन वर्षापूर्वीचे राहिलेले रुपये 74/- चे बिलही येत्या आठवडयामध्ये अदा करणेत येणार आहे. तसेच कामगारांचे पगारही ब­ऱ्या पैकी मार्गी लागतील. दामाजी कारखान्याचा कामगार हा प्रत्येक दुष्काळामध्ये सापडतो आहे. मी ठरलेप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेस कामगारांचे पगार करण्याचे नियोजन करतो आहे.  परंतु दुष्काळी परिस्थिती आणि त्यामध्ये तर पाच लाख मे.टनाचे गाळप एकदाही झालेले नाही त्यामुळे अडचणी येत आहेत. आपल्याकडे साखर सोडून कोणतेही उत्पन्न नसतांनाही फक्त कामगार,सभासद व ऊस उत्पादकांच्या श्रेयामुळेच आपण आर्थिक नियोजन करु शकतो.  येणारा सिझन हा चांगल्या प्रकारे होणारा असुन उजनी धरण शंभर टक्क्े भरल्यामुळे पुढील गाळप हंगाम सुध्दा यापेक्षाही चांगला होणार आहे. शिरनांदगी, हंगीरगे, पडोळकरवाडी तलाव पुर्ण क्षमतने भरले असुन तालुक्यातील बरेचसे तलाव  यावर्षीच्या पाऊसाने भरण्याची शक्यता आहे.    त्यामुळे येत्या दोन वर्षामध्ये आपणास पाण्याची कसलीही कमतरता भासणार नाही.
 आपण दुष्काळात जन्मलेलो असलो तरी  दुष्काळामध्ये मरणारही नाही. जेष्ठ संचालक मा.बबनराव आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ कामकाज करीत  असून सध्या कामकाजामध्ये आम्ही अत्यंत चिकाटी ठेवलेली आहे. आजतागायत ऊस उत्पादक शेतक­यांनी कारखान्यावर विश्वासार्हता दाखवून ऊस पुरवठा केलेला आहे.  त्यामुळे आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केलेले आहेत त्याच विश्वासावर आगामी गळीत हंगाम पूर्ण होईल असा विश्वास मनोगतातुन व्यक्त केला.
  कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांचे  स्वागत करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व मा.बबनराव आवताडे यांचे नेतृत्व व कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याचा गळीत हंगाम सन 2020-21 हा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. ऊस उत्पादकांचे कारखान्यावर असलेले प्रेमामुळे जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी ऊस देवून सहकार्य करावे. हंगामाकरिता आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा पुरेशा प्रमाणात भरती केली असून हंगाम चांगल्या प्रकारे पार पडणार असलेचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
           या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप,राजीव बाबर, शिवयोग्याप्पा पुजारी, मारुती थोरबोले, रामकृष्ण चव्हाण,  बाळासाो शिंदे,  सचिन शिवशरण,सौ.स्मिता म्हमाणे यांचेसह माजी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, पं.स.सदस्य लक्ष्मण मस्के, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, सरोज काझी, अॅड.धनंजय जाधव,  दामाजीनगर सरपंच अॅड.दत्तात्रय तोडकरी, नगरसेवक रामचंद्र कौंडुभैरी, प्रमोदकुमार म्हमाणे, कैलास कोळी, अविनाश मोरे,सुब्रााव यादव,दगडु सुतार, हरिभाऊ ताम्हणकर, सुधीर करंदीकर,वसंत लेंडवे,चिक्कलगीचे चेअरमन बिराजदार, बँक स्थायी तपासणीस विलास पाटील,कारखान्याचे –वर्क्स मॅनेजर -सुहास शिनगारे, शेतकी अधिकारी- रमेश पवार, कार्यालय अधिक्षक दगडू फटे, लेबर ऑफिसर – आप्पासाो शिनगारे, स्टोअर किपर- उत्तम भुसे, सुरक्षा अधिकारी – लक्ष्मण बेदरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष -विठ्ठलराव गायकवाड, कामगार पतसंस्थेचे चेअरमन –विश्वास सावंजीे, शेतकरी, सभासद, इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार संचालक सुरेश भाकरे यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *