ताज्याघडामोडी

कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या डिप्लोमा इंजिनिअरींग              प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर मार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश नोंदणी सुरु

कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या डिप्लोमा इंजिनिअरींग              प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर मार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश नोंदणी सुरु

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित मौजे शेळवे येथे सुरु असलेल्या कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज (डिप्लोमा इंजिनिअरींग) ची प्रथम व थेट व्दितीय वर्षांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया दि.१० सप्टेंबर २०२० पासून सुरु झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांचे साठी एफ.सी. (फॅसिलिटेशन सेंटर) ची सुविधा कॉलेजमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात अल्पावधीतच या कॉलेजने आपले वेगळे वलय निर्माण केले असुन मध्यमवर्गीय व शेतकरी वर्गांच्या पाल्यांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांची गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसींगचे पालन करुन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे व त्यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे. “कर्मयोगी पॅटर्न” या नावाने पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.श्री ए.बी.कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात या कॉलेजने शै.वर्ष-२००८ पासून चालू शैक्षणिक वर्षापर्यंत आपल्या प्रत्येक विभागाच्या वार्षिक  रिझल्टमधून कॉलेजचा आलेख उंचावत नेला आहे. त्यामुळे कॉलेज कॅम्पस् सिलेक्शनमध्ये जिल्ह्यात पहिल्या तीन कॉलेजमध्ये समावेश आहे.

प्रथम वर्षाची प्रवेश नोंदणी प्रक्रिया ही दि.२१ सप्टेंबर २०२० रोजी सायं.५.०० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच थेट द्वितीय वर्षाची प्रवेश नोंदणी प्रक्रिया ही दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी सायं.५.०० वाजेपर्यंत राहणार आहे. तरी विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करीता थोडाच कालावधी राहिला आहे. त्यामुळे ही संधी विद्यार्थ्यांनी घालवू नये असे आवाहन पॉलिटेक्निकचे प्राचार्य, डॉ.श्री.ए.बी.कणसे यांनी केले आहे.

  • फॅसिलिटेशन सेंटर मार्फत प्रवेश प्रक्रिया नोंदणी वेळापत्रक व तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे-
  • प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करणे व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या छायाप्रती अपलोड करणेची दिनांक – १०.०८.२०२० ते दि.२१.०९.२०२० राहील.
  • प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणेची दिनांक- ११.०८.२०२० ते दि.२१.०९.२०२० राहील.
  • सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणेची दिनांक-२५.०९.२०२० ते दि.२७.०९.२०२० राहील.
  • अंतीम गुणवत्ता यादी प्रदर्शीत करणे दिनांक-२९.०९.२०२० राहील.

वरील प्रवेश नोंदणी बद्दल विद्यार्थ्यांनी फॅसिलिटेशन सेंटर येथील खाली दिलेल्या           प्राध्यापकांशी संपर्क साधावयाचा आहे.

  • फॅसिलिटेशन सेंटरसाठी संपर्क-  १. श्री पंढरपूरकर सर ९१४६५९७८२०

 २. श्री कोरबू सर –       ८८८८४८९२३५

                                          ३. श्री शेख सर –         ९८६०३०५९१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *