ताज्याघडामोडी

20 तारखेला बजाज फायनान्सच्या कार्यालयास टाळे ठोकू

20 तारखेला बजाज फायनान्सच्या कार्यालयास टाळे ठोकू

शिवक्रांती संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा 

महाराष्ट्राबरोबर भारत देशातही आर्थिक बाजू कोलमडली असून त्यामुळे गोरगरीब लोकांना दोन वेळेस जेवणाचीही अडचणी येत आहेत अशातच बजाज फायनान्स मात्र ज्या लोकांनी बजाज कडून प्रसनल लोन किंवा मोबाईल घेतले आहेत अशा लोकांना वसुली कर्मचारी सतत हप्त्यासाठी व दंडा साठी फोन करून त्रास देत आहेत. 

   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे कारण पंढरपुरातील व्यवसाय पूर्णतः मंदिराच्या जीवावर चालतो त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू सध्या बिकट आहे.व बजाजचा ईमआय भरण्याची त्यांची परिस्थीती नसून त्यांना भरण्यासाठी कालावधी वाढवून  मिळणे गरजेचे आहे.  मात्र  बजाज फायनान्सचे वसुलीसाठी नियुक्त कर्मचारी लोकांच्या घरी जाऊन किंवा फोन करून उद्धट भाषेत बोलताना आढळतात अशामुळे नाहक गोरगरीब लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.बजाज फायनान्सने हप्ते भरण्याची मुदत  वाढवून घ्यावी अन्यथा येत्या 20 तारखेला बजाज फायनान्स ला टाळे ठोकून आंदोलन धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

हे निवेदन देताना शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे. पंढरपूर शहर अध्यक्ष माऊली चव्हाण. पंढरपूर शहर प्रसिद्धीप्रमुख रणजीत सावंत. पंढरपूर शहर उपाध्यक्ष विकी काळे. पंढरपूर शहर संघटक मंगेश श्रीखंडे. ज्ञानप्रसाद शेटे व कार्यकर्ते उपस्थित होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *