ताज्याघडामोडी

स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची विप्रो कंपनीत निवड

स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची विप्रो कंपनीत निवड
 
पंढरपूरः-‘विप्रो’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
         आय.टी. क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील विप्रो या बहुराष्ट्रीय कंपनीने एन.एल.टी.एच या देशपातळीवरील ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे घेतलेल्या परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड केली. कंपनीच्या निवड समितीने अंतिम फेरीतून इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्रियांका भोसले, ऐश्वर्या निकम, श्रद्धा धसाडे व किरण कासुलवार तर  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या भाग्यश्री बाबा असे मिळून एकूण पाच विद्यार्थ्यांची विप्रो बहुराष्ट्रीय कंपनीत निवड करण्यात आली आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व प्रा.एस. व्ही.दर्शने यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युव्हमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *