ताज्याघडामोडी

राज्याअंतर्गत प्रवासावरील निर्बंध व त्यासाठी लागणारी ई पासची सक्ती त्वरित बंद करावी,छावा संघटनेचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन

राज्याअंतर्गत प्रवासावरील निर्बंध व त्यासाठी लागणारी ई पासची सक्ती त्वरित बंद करावी

छावा संघटनेचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन

पंढरपूर – राज्याअंतर्गत प्रवासावरील निर्बंध व त्यासाठी लागणारी ई पासची सक्ती त्वरित बंद करावी अश्या विषयाचे निवेदन आज सोलापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख व पंढरपूर चे प्रांत अधिकारी  सचिन ढोले साहेब यांना अखिल भारतीय छावा संघटने कडून देण्यात आले.

कोरोनाविषाणू संसर्गजन्य रोग प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शासनाकडून अनेक अशा उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या त्या अंतर्गत प्रवासावर ही बंदी घातली होती मात्र या कालावधीमध्ये संपूर्ण अर्थचक्र थांबल्याने समाजातील सर्वच वर्गाला आर्थिक फटका बसलेला आहे आता परिस्थिती हळूहळू सावरत असताना केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी प्रवासावरील बंदी हटवण्याच्या सुचना प्रत्येक राज्य सरकारला दिल्या असूनही महाराष्ट्र राज्य सरकारने याची अंमलबजावणी अजूनही केली नाही.
राज्यांतर्गत प्रवास बंदी व ई पास या जाचक अटीमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यांतर्गत प्रवासा वरील निर्बंध व ईपास सक्ती ताबडतोब बंद करावी व तसेच स्थानिक प्रशासनाला याबाबत दिलेले अधिकार काढून घ्यावेत ही नम्र विनंती.अश्या विषयाचे निवेदन आज अखिल भारतीय छावा संघटने कडून देण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण, नवनाथ शिंदे, हमीद नाडेवाले, नवनाथ करकमकर, सोमनाथ क्षीरसागर व इतर सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *