ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापक यांची सहविचार सभा संपन्न

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापक यांची सहविचार सभा संपन्न

आ.प्रशांत परिचारक यांनीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि विध्यार्थी सुरक्षेबाबत मांडले विचार  

 

 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये कोरोना या पार्श्वभूमीवर सर्वात मोठे संकट जगाबरोबर तसेच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या व ज्ञानदान करणार्‍या शिक्षण व्यवस्थेवर आले आहे. त्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील मान्यवर संस्थापक व मुख्‍याध्‍यापक यांची सहविचार मंच चर्चात्मक संवाद शाळा सुरू करण्याबाबत समस्या व उपाय यावर चर्चासत्र आयोजित केले.

          या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी पालकमंत्री  लक्ष्मणराव ढोबळे यांनी भूषवले त्याचप्रमाणे माननीय आमदार प्रशांतराव परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख,  चंद्रभागा सहकारी कारखान्याचे चेअरमन,  कल्याणराव काळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने, मंगळवेढ्याचे   रतनचंद शहा चेअरमन रतनचंद शहा को.ऑप.बॅक मंगळवेढा, अरिहंत पब्लिक स्कूलचे सचिव  उज्वल दोशी तसेच विविध शाळांचे संस्थापक मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

          सभेची सुरुवात करताना माननीय आमदार प्रशांत परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोरोनामुळे जगण्याची समीकरणे बदलली आहेत तसेच शाळा दोन सत्रामध्ये सुरू करावी किंवा ऑनलाइन पद्धती अवलंबली जावी यावर त्यांनी मार्गदर्शन व चर्चा केली. सर्वांनी शाळांमध्ये (एसएमएस) म्हणजेच सॅनिटाईजर-मास्क-सोशल डिस्टन्स हे सूत्र अवलंबावे असे आवाहन केले.

          त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणाचे फायदे-तोटे, ग्रामीण व शहरी भागातील समस्या, त्याचबरोबर वाहतूक समस्या, सामाजिक आंतर, विद्यार्थी-शिक्षक यांनी घ्यावयाची काळजी सॅनिटाईजर चा वापर व शाळा सुरु करण्याच्या समस्या व उपाय यावर चर्चा करण्यात आली. यावेळी वसंत नाना देशमुख, सुभाष माने सर, उज्वल जोशी सर, सुप्रिया बहिरट मॅडम, प्रशांत पाटील सर, एस पी कुलकर्णी सर व बागवान मॅडम, जयश्री चव्हाण मॅडम तसेच कर्मयोगी प्रशालेच्या प्राचार्या शैला कर्णेकर मॅडम यांनी या विषयांवर चर्चा केली.

          याप्रसंगी आपल्या भाषण शैलीचा प्रभाव दाखवत माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांनी शाळेतील बेंच मांडण्याची पद्धत, टेलिव्हिजनवरील शैक्षणिक उपक्रम व मार्गदर्शन तसेच शाळा निर्जंतुकीकरण, टॅबचे ऑनलाइन शिक्षणामध्ये असणारे महत्त्व यावर त्यांनी चर्चा व मार्गदर्शन केले.

            या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेचे रजिस्ट्रार  गणेश वाळके सर तसेच प्राचार्या शैला कर्णेकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगीनी ताठे यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी दशरथ यांनी केले या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *