गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरातील एका क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापकाने लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप

पंढरपुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना सोसायटीच्या लाखो रुपयांचा केल्याचे उघडकीस आले असून त्याच बरोबर ठेवीदारांची ३ लाख ६० हजरांची रक्कम परस्पर सह्या करून हडप केल्याने सदर व्यवस्थपका विरोधात क्रेडिट सोसायटीने कारवाईचा बडगा उगारला आहे.अपहार केलेल्या रक्कमेपैकी एकुण 3,85,000/-रूपये सोसायटीला त्या माजी व्यवस्थापकाने २ महिन्यापूर्वी रोख स्वरूपात परत केले खरे पण उर्वरित रक्कम   5,13,318/-रु. ची फसवणुक करुन अपहार केलेला आहे असा त्या क्रेडिट सोसायटीचा आक्षेप आहे.

मात्र आपल्या क्रेडिट सोसायटीच्या असलेल्या लौकिकास धक्का लागू नये म्हणून संचालक मंडळाने वयोवृद्ध ठेवीदार व महिला ठेवीदाराची रक्कम परत करत आपला विश्वास जपला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *