ताज्याघडामोडी

भटजी,बॅंडवाले,फोटोग्राफर आम्हाला ऍडव्हान्स परत देत नाहीत, तुम्हीही आम्हाला ऍडव्हान्स परत मागू नका !

भटजी,बॅंडवाले,फोटोग्राफर आम्हाला ऍडव्हान्स परत देत नाहीत, तुम्हीही आम्हाला ऍडव्हान्स परत मागू नका !

पंढपुरातील मंगल कार्यालय चालकांची भूमिका 

एडव्हान्स परत द्यावाच लागेल -दिलीप धोत्रे  

आमरसाच्या भोजनासाठी ऑर्डर होती पण ऍडव्हान्सच दिला नव्हता,एका आंबेविक्रेत्यांची प्रतिक्रिया

२४ मार्च रोजी देशभरासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.तत्पूर्वीच महाराष्ट्रात पुणे येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने राज्यात मॉल,सिनेमागृहे आदी गर्दी होण्यास कारणीभूत ठरणारे आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश राज्य शासनाने दिला होता.त्याच बरोबर सार्वजनिक कार्यक्रम,सभा,समारंभ व गर्दीजमवून केले जाणारे लग्न सोहळे यासही आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार प्रतिबंध करण्यात आला होता.मात्र कोरोनामुळे अनेक लग्नसोहळे घरगुती पध्द्तीने उरकण्यात आले आहेत. मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यामुळे मंगल कार्यालयात आयोजित हे लग्न सोहळे रद्द झाले असले बहुतांश विवाह हे घरगुती पद्धतीने पार पडले आहेत.मात्र ज्यांनी अनेक महिने आधीच घोटाळा नको म्हणून हजारोंच्या-लाखाच्या पटीत ऍडव्हान्स देऊन सदर मंगल कार्यालये आरक्षित केली होती.त्या मंगल कार्यालय मालकांनी आता ऍडव्हान्स म्हणून जमा केलेली रक्कम परत देण्यास नकार दिला असून सदर रक्कम आम्ही भटजी, बँडवाले, फोटोग्राफर, अन्नधान्य, आचारी, घोडेवाला, मंडपवाला आदीना दिलेली रक्कम परत देत नाहीत त्यामुळे बुकिंग केलेल्या व्यक्तींना आम्ही त्यांचा ऍडव्हान्स परत देऊ शकत नाही अशी भूमिका घेतली आहे.    

             मार्च, एप्रिल आणि मे हा लग्नसोहळ्याचा सिझन समजल्या जाणाऱ्या काळात लग्न सोहळा थाटात पार पडण्यासाठी शहरातील व शहरा लगतच्या अनेक मंगल कार्यालयाचे बुकिंग काही वेळा अगदी वर्ष-वर्ष आधी होत असल्याचे दिसून येते.तर शहरातील काही मंगल कार्यालयाचे भाडे हे थेट लाखाच्या पटीत असून विशिष्ट मंगल कार्यालयात अथवा मठात लग्न लग्न सोहळा आयोजित करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते.त्या मुळे अशा कार्यालयात आपल्या कुटूंबातील लग्न समारंभ आयोजित करण्याकडे अनेकांचा कल असतो.मात्र कोरोना मुळे सार्वजनिक लग्नसोहळे रद्द करण्यात आले असून लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात तर लग्न सोहळ्याच्या आयोजनास पूर्णपणे प्रतिबंध होता मात्र पुढे यात शिथिलता आणून आता ५० व्यक्तीच्या उपस्थितीत लग्न समारोह पार पाडता येणार आहे.  

         गत तीन महिन्याच्या काळातील सुमुहूर्तावर ज्यांनी लग्न समारंभ आयोजित केला होता व त्यासाठी पंढरपूर शहर व परिसरातील मंगल कार्यालये ऍडव्हांस भरून आरक्षित केली होती त्यांची मात्र या आर्थिक संकटाच्या काळात मोठी गोची झाली असून लग्न सोहळा तर घरगुती पद्धतीने कुठे घराच्या अंगणात तर कुठे शेतशिवारात सध्या पद्धतीने पार पाडला आता या मंगल कार्यालयाकडे भरलेला हजारो-लाखोंचा ऍडव्हान्स परत मिळावा म्हणून हे लोक सदर मंगल कार्यालय चालकाकडे हेलपाटे मारत असतानाच आज पंढरपुरातील मंगल करील;कार्यलय चालक संघटनेने थेट ऍडव्हान्स परत मागू नका अशीच भूमिका घेतली आहे. या बाबत अधीक माहिती जाणून घेण्यासाठी  संपर्क करण्याच्या हेतूने या संघटनेचे अध्यक्ष व सचिव कोण आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळू शकली नाही.मात्र या मंगल कार्यालय चालकांनी बदली तारीख देण्याची आपली तयारी दर्शविली असली तरी कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पूर्वीप्रमाणे जंगी लग्नसोहळे आयोजित करण्यास आणखी काही महिने तरी परवानगी मिळणे अशक्य असून त्याच वेळी मुहूर्त हा महत्वाचा समजून लग्नसोहळे उरकण्याकडे बहुतांश वधू-वर पक्षाचा कल असल्यामुळे केवळ मंगल कार्यलयातच लग्न व्हावे हा हेतू निरस्त ठरत आहे. 

        मंगल कार्यलय कार्यालय चालक-मालकांनी ऍडव्हान्स परत देण्यास नकार दिल्यामुळे अनेक वर-वधू पित्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून बहुतांश मंगल कार्यलयानी शंभर टक्के रक्कम भरल्याशिवाय बुकिंग नाही अशीच भूमिका घेतली असल्यामुळे आम्ही पूर्ण रक्कम भरली आहे.या बरोबरच आचारी,बॅंडवाला,भटजी,फोटोग्राफर,व्हिडीओ शूटिंगवाला,डेकोरेशन व्यवसायिक याला आम्ही स्वतः वेगळे ठरवून रकमा ऍडव्हान्स दिल्या आहेत असे असताना सदर मंगल कार्यालय चालकांनी या आर्थिक अडचणीच्या काळात एडव्हान्स परत देण्यास नकार देणे बेकायदेशी व चुकीचे आहे.अनेक वधू-वर पक्षाकडील कुटूंबे हि कर्जे काढून विवाह सोहळा आयोजित करतात.आणि बहुतांश मंगल कार्यालय चालक शंभर टक्के रक्कम भरून घेतल्याशिवाय बुकिंग करत नाहीत असे असताना आता सदर रकमा परत देण्यास नकार देणे चुकीचे आहे.ज्यांनी ऍडव्हान्स रकमा भरल्या आहेत त्यांनी पावतीसह संपर्क साधावा असे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना केले आहे.      

 आंबे विक्रेत्यानेही व्यक्त केली नाराजी  

आज मंगल कार्यलय चालकांनी विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय बुकिंग करणाऱ्या व्यक्तींचे ऍडव्हान्स परत देण्यास नकार दिला असल्याचे व हा नकार देण्यामागे आचारी,बॅंडवाला,भटजी,फोटोग्राफर,व्हिडीओ शूटिंगवाला,डेकोरेशन व्यवसायिक यांना आधीच ऍडव्हान्स दिल्यामुळे व ते आता ऍडव्हान्स परत देण्यास नकार देत असल्यामुळे वर-वधू पक्षास ऍडव्हान्स परत देण्यास हे कारण सांगण्यात आले आहे मात्र अनेक विवाह समारंभात या काळात विशेष बेत म्हणून आंब्याच्या आमरसाचे जेवण पाहुण्यांना दिले जाते,मला काही लग्नसोहळ्यासाठी आंब्याची ऑर्डर होती पण मला ऍडव्हान्स दिला गेला नव्हता आता हि ऑर्डर रद्द झाल्यामुळे माझेही मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया या आंबा विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *