ताज्याघडामोडी

अजनसोंड येथे अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पोलीस कारवाईत उघड 

अजनसोंड येथे अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पोलीस कारवाईत उघड 

क्रेनसह ट्रॅक्टर ताब्यात तर दोंघावर गुन्हा दाखल 

एकीकडे पोलीस प्रशासन लॉक डाउनच्या पार्शवभूमीवर बंदोबस्तात व्यस्त असताना दुसरीकडे तालुक्यात अवैध वाळू  उपसा करणाऱ्यांचे धाडस वाढले असल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर शहर परिसरातील नदीकाठच्या भागातून होत असलेल्या अवैध वाळू उपशास ब्रेक लावण्यात शहर पोलीस यशस्वी ठरलेले असतानाच पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या विविध गावातून सर्रासपणे भरदिवसाही अवैध वाळू उपसा  सुरु असल्याचे पोलीस कारवाईत उघड होत आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत अजनसोंड येथे क्रेनच्या साहाय्याने  अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर ४ ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 1) गुरुदेव ज्ञानदेव डुबल वय 22 वर्षे रा. अंजनसोंड ता. पंढरपुर तसेच 2) नितीन घाडगे रा. अजनसोंड ता. पंढरपुर (रान मालक) यांच्या विरोधात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ – 15,9 ; भारतीय दंड संहिता १८६० – ३४,३७९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *