ताज्याघडामोडी

बंद काळात फिरून मावा विक्री 

बंद काळात फिरून मावा विक्री 

पानपट्टी चालकाविरोधात गुन्हा दाखल 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.रस्त्यावर गुटखा,तंबाखूजन्य,मावा आदी पदार्थ खाऊन थुकणाऱ्या लोकांमुळे आरोग्यास मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अशा प्रकारची विक्री होणाऱ्या आस्थापणा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत मात्र तरीही अनेक ठिकाणी चोरून विक्री केली जात असल्याची तसेच काही पानपट्टी चालक फिरून विक्री करत असल्याचा तक्रारी प्राप्त होत होत्या.
        या गंभीर प्रकराची दखल घेत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भंडीशेगाव ता. पंढरपूर येथे बस स्थानकाजवळ असलेल्या समर्थ पान शाँपचा चालक रणजित संजय दिक्षीत वय-22 रा-भंडीशेगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुकानाचे पाठीमागे फिरुन मावा(तंबाखुज्य पदार्थ) विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी , पो.नि.भस्मे यांच्या आदेशाने पो. हे.कॉ. जाधव ,पो.हे. कॉ. शेख ,पो. ना. सय्यद,पो. कॉ. राऊत हे खाजगी वाहनाने गेलो असता समर्थ पान शाँप या नावाचे पानपट्टी दुकानाचे पाठीमागे सदर इसम फिरुन मावा विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याचे ताब्यातील मावा (तंबाखुज्य पदार्थ) जप्त करण्यात आला असून त्याच्या भा.द.वि.कलम 188 सह कलम आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(ख) प्रमाणे पो. हे. कॉ. रमेश जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *