ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील १० अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरु 

पंढरपूर शहरातील १० अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरु 

१८ मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येणार तर १७ एप्रिल पर्यंत अंतिम निवड यादी जाहीर होणार

पंढरपूर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावतीने सुरु असलेल्या अनेक अंगणवाडी केंद्राच्या ठिकाणी मदतनिसांच्या जागा रिक्त होत्या.या जागांबाबत भरती प्रक्रिया केव्हा राबविली जाणार याची प्रतीक्षा केली जात असतानाच अखेर या भरती प्रक्रियेस सुरूवात झाली असून शहरातील १० अंगणवाडीच्या ठिकाणी रिक्त असलेल्या जागांसाठी ९ मार्च ते १८ मार्च या कालावधीत महिला उमेदवारांना  अर्जदाखल करता येणार आहेत. किमान ७ वी पास हि शिक्षणाची अट असून वयोमर्यादा वय वर्षे २१ ते ३० आहे.ज्या प्रभागातील अथवा वार्डातील अंगणवाडीसाठी अर्ज दाखल करायचा आहे त्याच प्रभागातील रहिवासी असणे हि प्रमुख अट आहे.त्याच बरोबर उमेदवारास २ पेक्षा जास्त अपत्य नसावेत. 

    पंढरपूर शहरात पुढील प्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.प्रभाग क्रमांक १ (हॉटेल विरंगुळा पाठीमागे),प्रभाग क्रमांक १(झेंडे गल्ली),प्रभाग क्रमांक २(संत मीराबाई मठाजवळ),प्रभाग क्रमांक ३(डोंबे व परीट गल्ली पंढपुर),प्रभाग क्रमांक ४(कोळेगल्ली),प्रभाग क्रमांक ५(विणेगल्ली),प्रभाग क्रमांक ८(माळी गल्ली बडवेचर),प्रभाग क्रमांक १२ (सह्याद्री नगर इसबावी),प्रभाग क्रमांक १३(शाकुंतल नगर),प्रभाग क्रमांक १७(गुरुदेवनगर सांगोला रस्ता) या ठिकाणी मदतनीस पदांची नियुक्ती प्रस्तावित आहे. त्याच बरोबर सांगोला आणि मंगळवेढा येथील मदतनिसांच्या रिक्त जागाही भरल्या जाणार आहेत.  

  या बाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधीकारी (नागरी),४६४७ गीता हौसिंग सोसायटी,मनीषा नगर,भाजी मंडईमागे पंढरपूर यांच्याशी संपर्क करावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *