गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेडमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने आपली जीवन यात्रा संपवली आहे.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता कदम असे मयत तरुणीचे नाव आहे. ती उस्मानाबादची रहिवाशी होती. नांदेडच्या श्री गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई यांत्रिकी शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत होती.

गीता कदम ही दोन दिवसांपासून बेपत्ता होती. 21 सप्टेंबर रोजी गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहामधील एका खोलीत रात्री 11 वाजेच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंख्याला दोरी लावून तिने गळफास घेतला होता. त्यानंतर वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून गीताने आत्महत्या केल्याची सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या प्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

बुधवारपासून गायब असलेल्या या तरुणीने हॉस्टेलच्या एका खोलीत जाऊन ही आत्महत्या केल्याची माहिती प्राचार्यानी दिली. दरम्यान, मयत तरुणीने महिला आयोगाच्या नावाने सुसाईड नोट लिहिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *