ताज्याघडामोडी

पंढरपूरातून दहा दिवसात ४ मोटारसायकलची चोरी  

पंढरपूरातून दहा दिवसात ४ मोटारसायकलची चोरी  

वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण 

गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र सुरु असून गेल्या दहा दिवसात सरासरी दरदिवशी एक चोरीचा प्रकार घडत आहे,टाकळी रोड परिसरात चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले तर पंढरपुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे पाकीट चोरीची  प्रकार घडला आहे.त्यामुळे पंढरपूर शहरात चोरांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.   

   अशातच पंढरपूर शहरातून मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या दहा दिवसात चार दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत.पंढरपूर शहरातील १) अतुल अशोक माने रा.बंकटस्वामी मठासमोर पंढरपूर यांची घराशेजारी लावलेली दुचाकी पॅशन प्लस  MH/13AL2916  २) विद्याधर दिनकर सहस्रबुध्दे वरा- शिंदेशाही अपार्टमेंट इसबावी यांची दुचाकी   होन्डा युनिकाँर्न  MH/45.Z/6202 ३) शंकर हनमंत वाईकर वय-34वर्षे, धंदा-शेती,रा- शिरसगाव ता. कडेगाव, जि-सांगली यांची अर्बन बँकेनजीक लावलेली बजाज बाँक्सर .MH/10.B/3941 ४)  मंगेश मुरलीधर मोरे वय-51वर्षे, धंदा-नोकरी(शिक्षक),रा- प्लाँट नं.121शिवकिर्ती नगर पंढरपूर यांची होन्डा शाईन   MH/13. AU/5667 या मोटारसायकल चोरीस गेल्या आहेत.यापैकी काही घटना तर अगदी वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा घडल्या आहेत तर घराच्या आवारात लावलेली मोटारसायकल चोरून नेण्याचे धाडसही चोरटयांनी दाखवले आहे.मात्र य साऱ्या घटनाक्रमामुळे वाहनधारकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कुठल्याही शासकीय कार्यालयात,बँका अथवा सार्वजनिक ठिकाणी जाताना आता गाडीवर लक्ष ठेवण्यासाठी कुणाला तरी सोबत नेण्याचा सल्ला जागरूक नागरिकांकडून दिला -घेतला जात आहे.तर शहरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे महत्व पुन्हा एकदा विशद केले जाऊ लागले असले तरी चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा तपास लागण्याचे प्रमाण अतिशय कमी असलयाने  नाराजीही प्रकट केली जाऊ लागली आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *