ताज्याघडामोडी

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना ‘क्लीन चिट’

कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याप्रकरणात या सर्व गुन्ह्यांतून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी आयोगाला याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, भिडे यांचे वकील ऍड. पुष्कर दुर्गे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव, संघटीत गुन्हेगारी या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. चाळीसहून अधिक जणांवर गुन्हे असून, काही महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला. यामध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळून आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला नाही. इतर आरोपींच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे ऍड. पुष्कर दुर्गे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *