ताज्याघडामोडी

40 कोटींची कॅश असलेले 21 खोके पाहून आयकर अधिकारीही चक्रावले: काँग्रेसच्या नेत्याच्या घरात सापडलं घबाड

कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री आयकर विभागाने एका फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात कोटींची रक्कम जप्त केली आहे.

काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या निवासस्थानावर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या फ्लॅटवर आयकर विभागाने हे छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या छाप्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या छाप्यात सापडलेली रक्कम पाहून आयकर विभागाच्या पथक स्वत: थक्क झाले आहे.

आयकर अधिकार्‍यांनी बेंगळुरूमधील सुलतानपल्यातील आत्मानंद कॉलनीतील एका फ्लॅटवर छापा टाकला आणि 40 कोटींहून अधिक रोख जप्त केल्याचे सांगितले जात आहे. कंत्राटदार आर अंबिकापथी आणि त्यांच्या माजी नगरसेविका पत्नी अश्वथम्मा यांच्या फ्लॅटवर हा छापा टाकला गेल्याची माहिती समोर आली आहे. आयकर अधिकार्‍यांच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा पोलिस कर्मचार्‍यांसह फ्लॅटवर छापा टाकला आणि 40 कोटींहून अधिक रोख असलेले 21 हून अधिक बॉक्स जप्त केल्याचे सांगण्यात आले. आयकर विभागाला खोलीत पलंगाखाली एकदाही न वापरलेल्या पैशांनी भरलेले सुमारे 21 बॉक्स सापडले. हे पैसे शेजारच्या राज्यात पोहचवले जाणार होते अशीही माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *