ताज्याघडामोडी

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या वतीने निराधारांना अन्नदान

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या वतीने निराधारांना अन्नदान

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्यच्या वतीने पंढरपुरातील गरजू निराधार आश्रितांना संस्थापक अध्यक्ष शंकर पोवार व कोकण प्रांत महिला अध्यक्ष मनीषा चोंणकर मॅडम यांच्या मार्गदर्शना  बेघर निवास पत्रा शेड पंढरपूर व तसेच दत्त घाट अन्नदान करण्यात आले.       या कठीण काळात गरीब गरजू निराधार लोकांना अन्नदानाची गरज लक्षात घेऊन एक कर्तव्य म्हणून जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य पंढरपूरचे शहर प्रमुख रुपेश संत यांच्या वतीने सोशल डिस्टन्स चे नियम पाळून खिचडी वाटप करण्यात आले.

       या  प्रसंगी श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी दिनेश सपकाळ,ऋषिकेश रोकडे,सिडद्धेवर मोरे  व जोशी,औदुंबर मोरे, फिरोज पटवेकरी, महेश रेड्डी,अनिल देवमारे,मुकुंदा रोकडे, यांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *