गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घरं बंद करून नेपाळला गेले, 6 महिने भाडंही दिलं, पण जेव्हा घरमालाकडे दार उघडलं, सगळेच हादरले

काही गुन्ह्यांची उकल करणं हे पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान असतं. ठोस पुरावे नसल्यास हे आव्हान आणखी कठीण होतं. कोलकाता पोलिसांसमोर सध्या अशाच प्रकारचं आव्हान आहे. कोलकात्यातल्या एका भाडेतत्त्वावर दिलेल्या घरात मानवी सांगाडा सापडला आहे. हा सापळा कोणाचा आहे या संदर्भात पोलीस सध्या तपास करत आहेत. प्रथमदर्शनी हा सांगाडा महिलेचा असावा असं बोललं जात आहे. त्याबाबत अद्याप ठोस खुलासा झालेला नाही. या प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. या संदर्भात पोलीस चौकशी करत आहेत.

कोलकात्यातल्या एका बेडरूमच्या एका घराची साफसफाई सुरू होती. काही मजूर हे काम करत होते. हे घर गेल्या दोन वर्षांपासून बंद होतं. त्यामुळे घरात सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. मजूर घरातलं प्रत्येक सामान बाजूला करत होते. तेवढ्यात त्यांना निळ्या रंगाचा एक ड्रम दिसला. त्यांनी तो ड्रम बाहेर काढला; पण त्याचं झाकणं सिमेंटने बंद केलेलं होतं. मोठ्या मुश्किलीनं मजुरांनी हे झाकण उघडलं. झाकण उघडताच आतलं दृश्य पाहून मजुरांना धक्का बसला. कारण त्या ड्रममध्ये मानवी सांगडा पडलेला होता.

केवळ हाडं शिल्लक होती. या सांगड्याच्या एका हातात काही बांगड्या होत्या. मृतदेहावर एक कापड होतं. तो नाइटसूट असावा असा अंदाज लावला जात आहे. सांगाडा पाहताच मजूर घाबरले. त्यांनी घरमालक गोपाळ मुखर्जी कोकोला बोलावलं आणि सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मानवी सांगाडा सापडल्याचं समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. हे घर दोन वर्षांपासून बंद असताना तिथं हा सांगाडा कुठून आला, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *